Elon Musk Meme: एलॉन मस्क हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्याने गेल्या वर्षीच ट्विटर विकत घेतले. तेव्हापासून तो इतर अनेक गोष्टींमुळे चर्चेत येऊ लागला आहे. सध्या सोशल मीडियावर तो एका खास कारणामुळे चर्चेत आहे. एलॉन मस्क पाकिस्तानात दिसल्याचा दावा केला जात आहे. सध्या सोशल मीडियावर एक मीम व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाकिस्तानी एलॉन मस्कचा हा फोटो पाहून लोक विचारत आहेत की, एलॉन मस्क कधी पाकिस्तानात पोहोचला आणि त्यावर मजेदार प्रतिक्रिया देत आहेत. जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि मस्क पाकिस्तानात पोहोचण्यामागील सत्य काय आहे?

पाकिस्तानी एलॉन मस्कचे मीम व्हायरल

आजकाल सोशल मीडियावर अनेक मीम मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. दरम्यान एलॉन मस्कचा पाकिस्तानमध्ये बाजारात फळे खरेदी करतानाचा फोटो समोर येत आहे. या फोटोमध्ये ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांना सलवार कमीज आणि कोट घालून पाकिस्तानी नागरिक दाखवण्यात आले आहे. तो पाकिस्तानच्या रस्त्यांवर गरीब माणूस म्हणून फिरताना दिसतो आहे.

एकाने ट्विटरवर फोटो पोस्ट करुन, ‘पाकिस्तानमध्ये फ्रूट चाटसाठी फळे खरेदी केल्यानंतर एलोन मस्क’ असे कॅप्शन दिले आहे.

हेही वाचा – ‘बिजली बिजली’ गाण्यावर थिरकला नीरज चोप्रा; पाहा गोल्डन बॉयचा व्हायरल व्हिडिओ

मस्कने पाकिस्तानात फळे खरेदी केली!

रमजानच्या पवित्र महिन्यात, कुटुंबांसाठी इफ्तारसाठी फ्रूट चाट खाणे सामान्य आहे. या दिवसात लोकांना फळे खरेदी करायला आवडतात पण, पाकिस्तानात फळांची किंमत खूप जास्त आहे, तिथे सध्या महागाई गगनाला भिडली आहे. अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे लोक हैराण झाले आहेत आणि अनेकांना या वस्तूंच्या खरेदीवर बहिष्कार टाकायचा आहे. त्यामुळेच असे मीम्स केले जात आहेत. ”पाकिस्तानात महागाई इतकी वाढली आहे की, आता फक्त मस्कसारखे श्रीमंत लोकच खरेदी करू शकतात” अशी उपाहासात्मक टिका या मीम्समधून केली आहे.

एलॉन मस्कचा झाला एलॉन खान

गंमत म्हणजे या मीमवर प्रतिक्रिया देताना यूजर्स एलॉन मस्कला ‘एलॉन खान’ असेही संबोधत आहेत. त्याचवेळी काही लोक आश्चर्याने विचारत आहेत की, एलॉन मस्क पाकिस्तानात कधी आणि का पोहोचला? मात्र, या दाव्यात तथ्य नाही. पण, फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती नक्कीच एलोन मस्कसारखी दिसते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elon musk spotted in pakistan while buying fruits pic meme goes viral snk