गेल्या महिन्याभरापासून ट्विटरचा सीईओ एलॉन मस्क आणि फेसबुकचा सीईओ मार्क झकरबर्ग यांच्यात ऑनलाईन द्वंद्व चालल्याचं पाहायला मिळत आहे. दोघे एकमेकांना समोरासमोर फाईटसाठी आव्हान देताना दिसत आहेत. महिन्याभरापूर्वी साध्या ऑनलाईन खोचक टोलेबाजीने सुरू झालेला हा ऑनलाईन सामना आता खरंच ऑफलाईन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आज एलॉन मस्कनं केलेल्या एका सूचक ट्वीटमुळे या चर्चेला उधाण आलं असून आता या दोघांचे फॉलोअर्स या प्रत्यक्ष फाईटची चर्चा करू लागले आहेत!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे ट्वीट?

गेल्या महिन्याभरापासून या दोघांमध्ये चालू असलेल्या ऑनलाईन कलगीतुऱ्याच्या पार्श्वभूमीवर एलॉन मस्कनं आज सकाळी केलेलं सूचक ट्वीट ही फाईट प्रत्यक्ष होण्याची शक्यता बळावण्यासाठी कारणीभूत ठरत आहे. या ट्वीटमध्ये एलॉन मस्कनं प्रत्यक्ष फाईट होण्याची शक्यता असल्याचं नमूद केलं आहे. “फाईट कलोजियममध्ये होण्याची काही शक्यता आहे”, असं मस्कनं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर नेटिझन्समध्ये या फाईटबद्दल जोरदार चर्चा आणि तर्क-वितर्क सुरू झाले आहेत.

हा नेमका काय प्रकार आहे?

एलॉन मस्क आणि मार्क झकरबर्ग यांच्यातल्या या ‘ऑनलाईन फाईट’ला महिन्याभरापूर्वी सुरूवात झाली. मार्क झकरबर्गनं या महिन्याच्या सुरुवातीला आपण स्वत:साठी एक स्पर्धक शोधत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर केली होती. त्यानंतर झुकरबर्गनं त्यावर प्रतिक्रिया देताना आपण आव्हान स्वीकारत असल्याचं सांगितलं. तेव्हापासून या दोघांमध्ये या कथित ऑफलाईन फाईटवरून कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळत आहे.

फाईट झाल्यास कोण कुणावर वरचढ?

दरम्यान, या दोघांमध्ये जर खरंच रिंगमध्ये समोरासमोर फाईट झाली, तर त्यांच्यात कोण वरचढ ठरेल? याचीही जोरदार चर्चा नेटिझन्समध्ये पाहायला मिळत आहे. एलॉन मस्क ६ फूट उंच आहे, तर मार्क झकरबर्ग ५ फूट ८ इंच उंच आहे. मस्कच्या उंचीप्रमाणेच त्याचं वजनही झकरबर्गपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, असं असलं तरी मस्कपेक्षा झकरबर्गचं मार्शल आर्ट्समध्ये अनुभव जास्त आहे. झकरबर्गनं नुकतंच एका मार्शल आर्ट्स स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत तो विजयीही झाला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elon musk tweets about cage fight with mark zuckerberg in colosseum pmw
Show comments