टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी ४४ अब्ज डॉलर्सच्या करारासह ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर संपूर्ण जगभरात त्यांच्या नावाची तुफान चर्चा आहे. कोणत्याही प्रकल्पात हटके काम करुन त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करण्याचा उद्देश एलॉन मस्क यांचा असतो. अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी मस्क नेहमी प्रयत्नशील असतात. आता स्मार्टफोनच्या जगातही Elon Musk अशाच प्रकारचं काम ते करु शकतात. Apple iphone आणि Android स्मार्टफोनला टक्कर देण्यासाठी एक युनिक स्मार्टफोन बनवण्याची घोषणा मस्क यांनी केलीय. हा फोन अॅपल आयफोन आणि एन्ड्रॉईडलाही टक्कर देणार आहे. सध्या स्मार्टफोनच्या दुनियेत एन्ड्रॉईड आणि ios यांचा बोलबाला आहे. अशातच आता एलॉन मस्क स्मार्टफोन मार्केटमध्ये दोघांचा दबदबा कमी करण्याच्या इराद्यात आहेत.
एलॉन मस्क यांच्याकडे ट्विटर युजरने केली तक्रार
liz wheeler नावाच्या एका ट्विटर युजरने एलॉन मस्क यांना टॅग करून लिहिलं की, जर अॅपल आणि गुगलने त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून twitter ला हटवलं, तर काय होईल? एलॉन मस्क यांना स्वत:चा स्मार्टफोन बनवायला पाहिजे का? असं काही घडलं, तर लोक एन्ड्ऱ़ॉईड आणि अॅपलच्या प्लॅटफॉर्मला सोडून देतील. जी व्यक्ती रॉकेटला मंगळ ग्रहापर्यंत पोहोचवू शकतो. तर एक छोटासा स्मार्टफोन बनवू नाही शकत का?
स्मार्टफोन बनवण्याचा एलॉन मस्क यांचा दावा
ट्विटर युजरने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना एलॉन मस्क म्हणाले, तुम्ही सांगितल्याप्रमाणे असं काही होणार नाही, असं मला आशा आहे. जर अन्य कोणता विकप्ल नसेल, तर मी स्मार्टफोन बनवेल. यावर युजर्सने कमेंट करत म्हटलं, एलॉन मस्क असे व्यक्ती आहेत, ज्यांनी स्मार्टफोन बनवण्याचा प्लान तयार केला आहे.