Viral video: बिबट्याची गणना धोकादायक आणि निर्दयी शिकारी प्राण्यांमध्येही केली जाते. याला सायलेंट किलर असेही म्हणतात. हा प्राणी एका झटक्यात आपल्या शिकारीवर तुटून पडतो. दिसायला सिंह आणि वाघापेक्षा तो खूपच लहान असला तरी तो अतिशय चपळ आणि दुष्ट भक्षक आहे. शिवाय त्याची शरीररचना अशी असते की तो उंचच उंच अशा झाडांवर सुद्धा सहजरित्या चढू शकतो. मागच्या काही वर्षांमध्ये प्राण्यांचं मानवी वस्तीकडे येण्याचं प्रमाण वाढलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भरवस्तीत बिबट्याचा थरार

अशातच बेंगळुरूच्या सिंगासंद्र परिसरात बिबट्याचा वावर आढळला असून वनविभागानं चार दिवसांनी बिबट्याला जेरबंद केलं आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. बिबट्याचं हे रेस्क्यू ऑफरेशन पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

बिबट्या अतिशय चपळ प्राणी आहे, त्याचा वेग पाहिला तर क्षणात तो या टोकावरुन त्या टोकावर जातो. अशातच बेंगळुरूच्या बेंगळुरूच्या सिंगासंद्र परिसरातील कुडलू गेटमधील अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये तो दिसल्यानंतर नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यानंतर नागरिकांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवलं. त्यानंतर वनविभागाने बिबट्याचा माग काढण्यासाठी एक पथक पाठवले. आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा लावून त्यांना जेरबंद केलं. जेरबंद केल्यानंतर अधिकाऱ्यांनी बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडलं आहे. याचे सीसीटीव्ही फटेजही समोर आलं आहे.

पाहा बिबट्याचा रेस्क्यू व्हिडीओ

हेही वाचा >> हरणाने दाखवलं सिंहाला अस्मान! तावडीतून असा सुटला की, थेट सिंहच तोंडावर आपटला! Video एकदा बघाच

वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे बिबट्याला पकडण्यासाठी ३० कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत होते. तसेच बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला होता. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून बिबट्याला पकडून सुखरुप जंगलात सोडणाऱ्या वन अधिकाऱ्यांवर कौतुकाचा वर्षावर होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elusive leopard spotted at bengaluru residential complex captured taken to bannerghatta for treatment video viral srk
Show comments