AI माणसांची जागा घेईल का? सध्या हा प्रश्न वारंवार चर्चेत येत आहे. बरं हा विषय वादाचा राहिला आहे, आणि त्यावर कोणतेही निश्चित असे उत्तर नाही. दरम्यान अशा परिस्थितीमध्ये एका महिलेने ChatGPT मुळे तिची नोकरी गमावल्याची कबुली दिली आहे, परंतु हे सर्व तिच्या एकटीसह नक्कीच घडले नाही. प्रतिभावान लेखिका आणि स्टँड-अप कॉमेडियन असलेल्या एका महिलेने अलीकडेच व्हायरल फेमच्या जगातील तिच्या अनपेक्षित प्रवासाबाबत सांगितले. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AI मुळे तिने नोकरी कशी गमावली याबाबत खुलासा केला आहे. एमिली हॅन्ली ही क्रिएटिव्ह फ्रिलान्सर अनेक वर्षांपासून कॉपीरायटर म्हणून काम करत होती, विविध ब्रँडसाठी कॉन्टेट तयार करत होती.

बिझनेस इन्सायडरला दिलेल्या मुलाखतीने एमिलीने सांगितले की, ”सुरुवातीला तिच्याकडील काम हळूहळू कमी झाले. दिवसेंदिवस तिला कमी असाइनमेंट्स मिळू लागल्य. एक लेखक म्हणून स्वतःच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पण नंतर तिच्या असे लक्षात आले की, दोष तिचा किंवा तिच्या कौशल्यांचा नाही. तिचे फ्रिलान्स काम कमी होण्यामागचे खरे कारण होते AI तंत्रज्ञान विशेषत: ChatGPT.

Pune advertise Ganpati Visarjan Miravnuk video viral
“जगात पैसा आहे फक्त तो कमवता आला पाहिजे” पुण्यातील हॉटेल बाहेरील जाहिरातीचा Video पाहून लोक म्हणाले, “पुढच्या वर्षीची बुकिंग…”
Puneri Pati shows the bitter truth of Kali Yuga
“बाप्पा मी हात जोडायचे विसरलो…” या पुणेरी पाटीने…
little boy apologized to Bappa
‘सॉरी बाप्पा, चुकून चिकन खाल्लं..’ बाप्पाची माफी मागत चिमुकला ढसाढसा रडला; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “त्याच्या भावनांशी खेळू..”
EY toxic culture controversy ashneer grover
Ashneer Grover EY story: “एक कोटी पगार; तरीही पहिल्याच दिवशी पळालो” अशनीर ग्रोवरनं सांगितला EY कंपनीतील धक्कादायक अनुभव
snake enters in classroom through ac vent viral video
एसी व्हेंटमधून अचानक बाहेर आला साप अन्…, विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह शिक्षकांची पळापळ; VIRAL VIDEO पाहून बसेल धक्का
Apple iPhone 16 mumbai viral video
नाद करा पण मुंबईकराचा कुठं…! पत्नी अन् मुलांसाठी पठ्ठ्यानं एकाच वेळी खरेदी केले चक्क ५ आयफोन; बघा Video
husband wife fight woman jump in naini lake
“जीव एवढा स्वस्त असतो का?” पतीबरोबर वाद अन् झालं होत्याचं नव्हतं; रागावलेल्या पत्नीने तलावात मारली उडी अन्…; पाहा video
happy birthday marathi version song
‘वाढदिवस आमच्या भाऊजींचा…’ ‘हॅपी बर्थडे’चं मराठी व्हर्जन कधी ऐकलंय का? मग हा VIDEO नक्की बघा
iphone 16 online delivery in 10 minutes by blinkit ceo shared post
फक्त एक क्लिक आणि १० मिनिटांच्या आत iPhone 16 तुमचा, Blinkitने अवघ्या काही वेळातच केला ३०० ऑर्डर्सचा टप्पा पार

ChatGPTमुळे गमावली नोकरी, 3 महिन्यांपासून बेरोजगार

AI तंत्रज्ञानवर आधारित लेखन साधनांचा(AI-powered writing tools) निर्माण दरम्यानच्या काळात झाला त्यापैकीच ChatGPT हे कमी खर्चात कॉन्टेट तयार करण्याचे काम करू लागले ज्यामुळे अल्पावधीतच ते लोकप्रिय ठरले.

एमिली म्हणाली की, ”तिच्या अनेक ग्राहकांनी, मुख्यतः लहान व्यवसाय, स्टार्टअप आणि नुकसतेच उदयाला आलेले ब्रँड, त्यांनी त्यांच्या कॉपीरायटिंग गरजा कमी खर्चात हाताळण्यासाठी AI तंत्रज्ञानाची निवड केली. त्यामुळे लेखिकेची एकेकाळी भरभराटीस आलेली फ्रिलान्स कारकीर्द मोडकळीला आली आणि नवीन संधी शोधणाऱ्या बेरोजगारांसारखी तिची अवस्था झाली आहे.”

 Emily Hanley a Woman reveals she lost her job to ChatGPT ( फोटो - Emily Hanle, LinkedIn)
एमिली हॅन्ली ही क्रिएटिव्ह फ्रिलान्सर अनेक वर्षांपासून कॉपीरायटरआहे.

कितीही प्रयत्न केले तरी नवीन नोकरी मिळवणे एमिलीसाठी एक मोठी चढाओढ होती. असंख्य इंटरव्ह्यूंना तिला अपयश आले त्यामुळे ती अनेक महिने बेरोजगार राहिली. आर्थिक ताणामुळे तिला अशा स्थितीचा विचार करण्यास प्रवृत्त केले. अखेर तिने ब्रँड अॅम्बेसेडरची भूमिका स्वीकारली तिने तिच्या कामाची जाहिरात करण्याचे ठरवले आणि तिच्या क्षेत्रात नोकरीसाठी अर्ज करत राहिली.

हेही वाचा – स्टार्टअप कंपनीने काढली भरती, २ दिवसात आले ३००० अर्ज, असे काय खास आहे या नोकरीमध्ये, जाणून घ्या

एमिली सांगते की, ”ChatGPT चा उदय आश्चर्यकारक आहे, ते सुरू झाल्यापासून अवघ्या दोन महिन्यांत १०० दशलक्ष युजर्स जोडले आहेत. जसजसे अधिक लोक AI चा वापर करतात आणि सूचना देतात तसतसे ते तंत्रज्ञान आणखी सुधारणा करते. त्यामुळे तिच्यासारख्या लेखकांना आणि विविध उद्योगांमधील इतरांना खरा धोका निर्माण होतो. दुर्दैवाने, हा लेखकाचा संघर्ष एका मोठ्या ट्रेंडची फक्त सुरुवात असू शकतो. काही अहवालांनुसार, AI तंत्रज्ञानामुळे हजारो नोकऱ्या गेल्या आहेत आणि सर्जनशील उद्योग (creative industries) यापासून वाचू शकणार नाहीत.”

अखेर एमलीचा हा संघर्ष पारंपारिक नोकऱ्यांवर होणारा AI चा प्रभाव दर्शवते जिथे अगदी सर्जनशील क्षेत्रातही, जिथे कमी खर्चात मिळाणारे तंत्रज्ञान हे लेखकांच्या क्रिएटिव्हीच्या (human creativity) मूल्यापेक्षा जास्त महत्व दिले जाते आहे. तंत्रज्ञानाची प्रगती होत असताना, अधिक कामगारांना अशाच प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो.