सेलेब्सच्या फॅशन सेन्समुळे मेट गाला दरवर्षी चर्चेत असतो. २०२२ च्या मेट गाला इव्हेंटमध्ये किम कार्दशियन चर्चेचा विषय ठरली. तिच्या ट्रान्सफॉर्मेशनने उपस्थित सर्वांना आश्चर्यचकित केले. पण या सगळ्याच्या दरम्यान, इंटरनेट सेन्सेशन एम्मा चेंबरलेनने देखील मेट गाला २०२२ मध्ये तिच्या लूकसह सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यंदाच्या मेट गालामध्ये एम्मा ऐतिहासिक नेकपीस परिधान करून आली होती, ज्यामुळे ती आता प्रकाशझोतात आली आहे.

मेट गाला २०२२ मध्ये एम्मा लुईस व्हिटॉनच्या पोशाखात दिसली. फुल स्लीव्ह क्रॉप टॉप आणि पांढऱ्या स्कर्टमध्ये एम्मा खूपच सुंदर दिसत होती. यासोबत तिने गळ्यात सुंदर नेकपीस घातला होता. असा दावा केला जातो की एम्माने घातलेला नेकपीस महाराजा पटियाला भूपिंदर सिंग यांचा नोबल चोकरपीस होता. या कारणास्तव, आता सोशल मीडियावर एम्माच्या लूकपेक्षा अधिक नोबल चोकरपीसची चर्चा होत आहे. बरेच लोक यासाठी तिला ट्रोलही करत आहेत.

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर रुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

एमाचे फोटो सोशल मीडियावर समोर आल्यानंतर आता लोक तिला ट्रोल करत आहेत. काही लोकांचे म्हणणे आहे की एम्माने घातलेला नेकपीस भारतातून चोरी करण्यात आला आहे. एका युजरने लिहिले, ‘हे पटियाला महाराजांचे दागिने आहेत. भारतीय इतिहासातील हा चोरीला गेलेला दागिना आहे, सेलिब्रिटींना दिलेला फॅन्सी पीस नाही. दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘जेव्हा चोरीचे सामान जागतिक मंचावर दाखवले जाते.’

Photos : प्रियंका मोहितेने रचला इतिहास; ठरली ८००० मीटरपेक्षा उंच पाच पर्वत सर करणारी भारतातील पहिली महिला

पटियालाच्या महाराजांकडे डी बीमर्स हा जगातील सातवा सर्वात मोठा हिरा होता, जो त्यांच्या हाराच्या मध्यभागी ठेवण्यात आला होता. कार्टियर या प्रसिद्ध कंपनीकडून त्यांनी ते विकत घेतले होते. १९२८ मध्ये महाराजांनी कंपनीला हार बनवण्याचे काम दिले होते, असा दावा केला जातो. १९४८ मध्ये महाराजांचा मुलगा यादविंदर सिंग याने तो हार घातल्यानंतर अचानक गायब झाला. लंडनमधील कार्टियर प्रतिनिधी एरिक नुसबॉम यांनी ५० वर्षांनंतर हार परत मिळवला. त्या वेळी, हारात डी बिअरचे स्टोन्स आणि बर्मी माणिक नव्हते. त्यामुळे कार्टियरने डी बीमर्स आणि इतर मूळ रत्नांशिवाय हा नेकपीस पुन्हा बनवण्याची योजना आखली.

Story img Loader