लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि खास क्षण असतो. त्यामुळे या दिवशी आपल्या जवळच्या लोकांनी यावं आणि आपल्याला आशीर्वाद द्यावेत, असं प्रत्येक नवरा-नवरीचं स्वप्न असतं. त्यासाठी महिनाभरापासून तयारी करण्यासह पाहुण्यांची यादी तयार केली जाते. त्यात आजी, मामा-मामी, मावशी, काका-काकी, आत्या सर्वांना आमंत्रण दिलं गेलंय ना याची खात्री केली जाते. पण, काही वेळा आपण आमंत्रण देऊनही एखादी आपल्या जवळची खास व्यक्ती लग्नाला उपस्थित राहू शकत नाही; जे समजल्यावर खूप वाईट वाटतं. असाच काहीसा प्रकार एका नवरीच्या बाबतीत घडला. आजारी आजीनं तिच्या लग्नात उपस्थित राहून आशीर्वाद द्यावेत, अशी तिची मनोमन इच्छा होती; पण ती आजारी असल्यानं येऊ शकणार नव्हती.
अशी परिस्थिती असली तरी आपल्या होणाऱ्या बायकोची इच्छा समजल्यावर जो प्रयत्नांची पराकाष्ठा करून, पत्नीच्या इच्छापूर्तीची भेट तिला देतो. तो नवरा विरळाच असतो. सोशल मीडियावर अशाच स्वरूपाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. त्या व्हिडीओमध्ये तो खास तिच्यासाठी लग्नात तिच्या आजीला घेऊन पोहोचला. नवऱ्याने दिलेली ही सुंदर ‘भेट’ पाहून नवरीला अश्रू अनावर झाल्याचे दिसतेय. लग्न समारंभातील अतिशय भावनिक करणारा आणि आजी आणि नातीमधील प्रेम दर्शविणारा हा व्हिडीओ आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरा-नवरी त्यांच्या लग्न समारंभासाठी स्टेजवर जात असतात. यावेळी पाहुण्यांमधील रांगेतून अंथरलेल्या रेड कार्पेटवरून चालताना नवरा बायकोच्या कानात काहीतरी कुजबुजला. त्यानंतर तिने पलीकडच्या बाजूला पाहिले तेव्हा तिला तिची आजी दिसली; जिला पाहून नवरीला अश्रू आवरता येत नव्हते.
नवरीची कितीही इच्छा असली तरी आजीची तब्येत बरी नसल्यामुळे ती काही आपल्या लग्नाला उपस्थित राहणार नाही, असे तिला वाटले. पण, लग्न समारंभ सुरू होण्याआधीच नवरा तिच्या आजीला घेऊन आला. यावेळी त्याने नवरीला इशारा करीत पलीकडे पाहण्यास सांगितले. अचानक खुर्चीवर बसलेल्या आजीला पाहून नवरी खूप भावूक झाली. तिने आजीला पाहताच अश्रू रोखण्याचा खूप प्रयत्न केला; पण शेवटी सर्व पाहुण्यांसमोर ती रडू लागली. यावेळी नवरीच्या मनाची झालेली अवस्था व्हिडीओत टिपण्यात आली आहे. यावेळी नवरदेव तिला सावरण्याचा प्रयत्न करतो.
पेट्रोल पंपावर तरुणीचे लज्जास्पद कृत्य; कर्मचाऱ्यासमोर पँट काढली अन्…; Video व्हायरल
@goodnews_movement नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा भावनिक करणारा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिलेल्या या व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव केला. कमेंट्समध्ये अनेकांनी नवरी खूप भाग्यवान आहे. तिची आजी खूप निरोगी आणि आनंदी वर्षे जगू दे, असे म्हटले आहे. तर काहींनी हे सगळ्यात सगळ्यात सुंदर ‘गिफ्ट’ असल्याचे म्हटले; तर काहींनी हा व्हिडीओ खरंच खूप ह्रदयस्पर्शी असल्याची कमेंट केली आहे.