Viral Rickshaw Father Emotional Quote Video : रस्त्यावरून प्रवास करताना अनेकदा ऑटोरिक्षा, बाईक किंवा ट्रक, टॅक्सीच्या मागे काही ना काही चिमटे काढणारी भन्नाट वाक्ये, थोरांचे विचार, अंजनदायी सुविचार किंवा संदेश लिहिलेले दिसतात. ते वाचून काही वेळा खूप हसायला येते. पण, त्यातील काही संदेश फारच भावनिक आणि विचार करायला लावणारे असतात. काही संदेशांमधून आई-वडील, पत्नी आणि इतर नात्यांविषयी अतिशय सोप्या आणि सुंदर शब्दांत भाष्य केलेले असते. ते वाचून प्रश्न पडतो की, रिक्षा, ट्रकचालक व मालकाला एवढं भन्नाट लिहून घ्यायला सुचत कसं… रिक्षावर लिहिलेले असे विचार नेहमीच लोकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या अशाच एका रिक्षावरील विचाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो वाचून अनेकांना वडिलांची, त्यांच्या कष्टाची जाणीव होत आहे. तर, काहींच्या डोळ्यांत वडिलांच्या आठवणीने अश्रू दाटून येत आहेत. लिहिलेल्या या संदेशामध्ये नेमकं
काय लिहिलं आहे ते जाणून घेऊ…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा