Viral video: भारतात ट्रक आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात. ट्रकच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून हे सगळे ट्रक पुण्याचेच आहेत की काय असाही प्रश्न पडतो.‘मेरा भारत महान’ आणि हॉर्न ओके तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत लपलेली कला याच ठिकाणी दिसून येते. जसं की ‘शेरो शायरी, म्हणी, टोमणे. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण ट्रकच्या मागे अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे.
रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक, टेम्पो दिसत असतात. हायवेवर धावणाऱ्या ट्रकची एक वेगळीच स्टाइल असते. मग ते त्यांचे म्युझिकल हॉर्न असोत किंवा त्यांच्या मागे लिहिलेले काही डायलॉग्स किंवा शायरी असो. रोड ट्रिपदरम्यान याची मजा काही औरच असते. दरम्यान पुणे-सोलापूर महामार्गावरील एका ट्रकच्या मागची अशीच एक पाटी व्हायरल होत आहे जी पाहून तुम्हीही भावूक व्हाल.
तुम्ही पाहिलं असेल ट्रकवर कमी वय असलेली मुलंही कामाला असतात. कधी स्वत: ड्रायव्हर तर कधी ड्रायव्हरचा सोबती म्हणून. याचं कारण असं की परिस्थितीमुळे आलेली जबाबदारी. कदाचीत हा ट्रक मालकही याच परिस्थितीतून कधीकाळी गेला असावा म्हणून त्यानं अशाप्रकारे पाटील आपल्या ट्रकच्या मागे लावली.
जेव्हा घरची जबाबदारी खांद्यावर येते
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या ट्रकच्या मागे लिहलं आहे की, “जेव्हा घरची जबाबदारी खांद्यावर येते ना तेव्हा,अंगातली मस्ती अपोआप कमी होते” हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत.
पाहा ट्रकच्या मागे काय लिहलंय
हेही वाचा >> लेकीसाठी काय पण! मुलीला फक्त श्रीमंत कुटुंबातूनच स्थळे यावीत म्हणून वडिलांनी ३ लाख रुपयांचं काय केलं पाहा
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला लोक खूप पसंत करत आहेत. अनेक लोक त्यावर कमेंटही करत आहेत.या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलंय.