एकाच आयुष्याची “सेकंड इंनिंग” म्हणजे सेवानिवृत्ती. सेवा निवृत्त झालेला मनुष्य जरी त्याच्या सेवेतून मुक्त झाला असला तरीही आयुष्याची फर्स्ट इंनिंग खेळल्याणानंतर सेकंड इंनिंग फार महत्वाची असते.सेकंड इंनिंगमध्ये रन किती काढावे हे जरी फिक्स असले तरी खेळावे फर्स्ट इंनिंग पासूनच लागते.आयुष्यभर सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्ती हा हक्काचा दिवस येतोच. ज्या सेवेच्या बदल्यात इतकी वर्षे आपण आपले कुटुंब चालवले मुलं लहानाचे मोठे केले त्याच सेवेतून निवृत्त होणे म्हणजे काळजाचे पाणीच होणे आहेच. असाच एक व्हिडी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सेवानिवृतीच्या दिवशी एका पायलट बापाला लेकींनी छान असं सरप्राईज दिलं आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

एका वृद्ध पायलटने निवृत्तीची घोषणा करताना आणि त्यांच्या शेवटच्या फ्लाइटमध्ये प्रवाशांना संबोधित करतानाचा हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ते त्यांच्या हातात ऑन-एअर घोषणा फोन धरून एका भावनिक मेसेजमध्ये लोकांना कळवतात की कर्णधार म्हणून त्यांचे हे शेवटचे उड्डाण आहे. ही घटना मियामीला जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या फ्लाइटमध्ये घडली, जिथे पायलटने त्यांच्या शेवटच्या उड्डानाबद्दल सांगितले आणि त्यांच्या मुलींनी यावेळी त्यांनी छान असं सरप्राईज दिलं. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पायलट शेवटची घोषणा करतात सांगतात की, अमेरिकन एअरलाइन्समध्ये हा माझा शेवटचा दिवस आहे…११,८३५ दिवस”.पायलट म्हणून मियामीला जाणारे हे त्यांचे शेवटचे उड्डाण असल्याबद्दल त्यांनी सुरुवातीला उल्लेख केला होता, त्यानंतर त्यांनी उड्डाणाच्या अनुभवातील आठवणी सांगितल्या. यावेळी त्यांच्या मुलींनी त्यांच्या शेवटच्या फ्लाईटमध्ये उपस्थित राहून वडिलांना सरप्राईज दिलं.

a father cried a lot while giving send off to his daughter in wedding
शेवटी बापाचं काळजी ते! मुलीला सासरी जाताना पाहून भर मांडवात वडील ढसा ढसा रडले! बाप-लेकीचा Video होतोय व्हायरल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
people are lucky who got love from grandma emotional video
“आजी म्हणजे काय?” VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, ” ज्या लोकांना आज्जीचे प्रेम मिळाले…”
Emotional message for father
“डोळ्यातले अश्रु डोळ्यांतच जिरवण्याची ताकद फक्त ‘बापाकडे’ असते” तरुणाची पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Who will understand the pain of parents
“आई वडिलांचे दु:ख कोण समजून घेणार” चिमुकल्याने सांगितले आई बाबांना वेळ देण्याचे दोन फायदे, VIDEO होतोय व्हायरल
Shocking video Year Old Boy Slaps Mother Repeatedly After Finding Her Over Drug Use
पोटच्या मुलानं आईला भररस्त्यात बेदम मारलं; कारण ऐकून नेटकरी म्हणाले बरोबर केलं; VIDEO पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं

यावेळी मुलींनी दिलेल्या सरप्राईजविषयी बोलताना पायलट सांगतात, “माझ्या सह-पायलट म्हणून माझ्या मुलीला विमानात बसवल्याबद्दल मी खूप भाग्यवान आहे”, यावेळी सगळ्यांच्याच चेहऱ्यावरचा आनंद तुम्ही पाहू शकता.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: ट्रेनमध्ये वृद्धाला हार्ट अटॅक; टीटीईने वाचवले प्राण, तरीही होतेय मोठ्या प्रमाणात टीका, तुम्हीच सांगा नेमकं काय चुकलं?

सोशल मीडियावर हा व्हिडीओ aviationforaviators नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज गेले असून नेटकरीही व्हिडीओ पाहून कौतुक करत आहेत तर काही भावूक प्रतिक्रिया देत आहेत. यावेळी एकानं या व्हिडीओखाली एक चारोळी लिहीली आहे, “आयुष्याच्या उत्तरार्धात हवी तेवढी करावी मस्ती, समाधान असू द्यावे चित्ती. आयुष्याची तेवत ठेवावी मोमबत्ती, परंतु स्वतःच्या मनमुराद जगण्यातून शेवटपर्यंत कधीही घेऊ नये निवृत्ती”.