आपल्या आजूबाजूला अनेक कॅन्सरग्रस्त रुग्ण असतात. कॅन्सरशी लढा देणे सोपे नाही, ही एक कठीण प्रक्रिया आहे. या परिस्थितीत रुग्णाला धैर्य राखणे अत्यंत आवश्यक असते. अशा वेळी अनेक लोक असतात जी चेहऱ्यावर हसू ठेवून या परिस्थितीचा सामना करतात. पण मनाने हळवी असणारी लोकं याकाळात घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींवर भावूक होतात. नुकताच याच संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून तुमचेही डोळे पाणावतील. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक कॅन्सरग्रस्त महिला केस कापण्यासाठी येते. यादरम्यान ती खूप भावूक होते आणि रडू लागते. यादरम्यान, महिलेला रडताना पाहून सलूनवाला असं काही करतो की ते पाहून तुम्हीही भारावून जाल.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कॅन्सरग्रस्त महिला सलूनमध्ये केस कापताना दिसत आहे. ज्यावेळी महिलेचे अर्धे केस कापून होतात तेव्हा ती महिला अचानक रडू लागते. यावेळी केस कापणारा सलूनवाला तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. मात्र तिचे रडणे सुरुचं असते. महिलेला असं रडताना पाहून सलूनवाला देखील भावूक होतो.
येथे पहा व्हिडिओ..
( हे ही वाचा : Video: हेल्मेट न घातलेल्या बुलेटस्वाराला पोलिसांनी पकडलं; पण ‘हा’ देसी जुगाड पाहून दंड न घेताच सोडून दिलं)
महिलेला असं रडताना पाहून सलूनवाल्याला देखील राहावंल नाही आणि तो तिच्या डोक्याचे चुंबन घेतो आणि तिला सांत्वन देतो. यानंतर तो हातात ट्रीमर घेतो आणि स्वतःचेही केस कापतो. हे पाहून महिला क्षणभर अवाक होते आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते . मात्र तो स्वतःचे सर्व केस कापतो. यादरम्यान दोघेही खूप भावूक होतात.