Farmer viral video: शेतकऱ्यासाठी पाणी म्हणजे सर्वकाही असतं. शेतीसाठी पाणी हा एक आवश्यक घटक असल्यामुळे पाण्याचा स्त्रोत मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे हे शेती उत्पादनाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण बाब आहे. याकरिता शेतामध्ये प्रामुख्याने विहिरी व बोअरवेल खोदले जातात.आपण पाहतो की बरेच शेतकरी जेव्हा शेतामध्ये विहीर किंवा बोअरवेल खोदायचा निर्णय घेतात तेव्हा त्यांच्या समोर सगळ्यात अगोदरचा प्रश्न पडतो तो कोणत्या ठिकाणी आपल्या जमिनीत पाणी असेल याचा. कारण जमिनीतील पाण्याचा नेमका शोध लावणे व त्याच ठिकाणी विहीर किंवा बोरवेल खोदायला घेणे हे आर्थिक दृष्टिकोनातून नुकसान होऊ नये याकरिता खूप महत्त्वाचे आहे. मात्र एकदा का जर पाणी लागलं की मग शेतकऱ्याचा आनंद गगनात मावत नाही. अशाच एका शेतकऱ्याच्या बोरला पाणी लागलं आणि त्याच्या आनंदाला पारावारच उरला नाही. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

शहरात राहणाऱ्यांसाठी पाण्याला फारसं महत्त्व नाहीये मात्र गावाकडे शेतकऱ्यासाठी हेच पाणी अमृतासारखं आहे. अशाच एका शेतकरी राजाच्या बोरला अखेर पाणी लागलं आणि सर्वांनी आनंद साजरा केला. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बोर खोदायचं काम सुरु आहे आणि अचानक बोरला पाणी लागतं. यावेळी शेतकरी निश्चिंत होतो आणि त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद तुम्ही पाहू शकता.हा शेतकरी दुसऱ्या शेतकऱ्याच्या अंगावर उडी मारतो आणि आनंदानं नाचू लागतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

आपल्या सर्वांना जे गोड पाणी मिळतंय ते पावसाचं हे तर सगळ्यांना माहिती असेलच. हे पाणी जमिनीवर पडतं आणि काही जमिनीत मुरतं, काही जमिनीवरून उताराच्या दिशेने वाहून जातं. जमिनीत मुरणारे पाणी मातीच्या विविध थरांतून खाली जातं, मुरूम आणि दगडाच्या अनेक थरांतून खाली जातं आणि शेवटी बरचसं पाणी तळाच्या कातळापर्यंत पोहोचतं. इथून, कातळाच्या काही ठिकाणी असलेल्या सूक्ष्म भेगांमधून जेमतेम १०-१२ टक्के पाणी अजून खाली जातं. असं पाणी शेकडो वर्षं मुरून जमा झालेलं असतं. बाकी पाणी कातळावर जमून विविध थरांमध्ये पसरतं, ज्याला आपण भूगर्भातील पाण्याची पातळी म्हणतो. ही विविध ठिकाणी भूगर्भ, माती, उतार, पाऊस वगैरे गोष्टींवर अवलंबून असल्याने वेगळी असू शकते. बोअरवेल करताना जोपर्यंत कातळ लागत नाही, तोपर्यंत केसिंग पाईप टाकतात. आणि कातळ लागल्यावर त्यात ड्रील करून खाली गेलेल्या १०-१२ टक्के पाण्याचा शोध घेतला जातो.अशाच एका शेतकऱ्याच्या बोरला अखेर पाणी लागलंय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> नवरदेव पाहताच नवरी भारावली! पाहुण्यांसमोरच केला भन्नाट डान्स; हौशी नवरीचा VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडीओ @Gulzar_sahab नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी कॅप्शनमध्ये “तुमच्यासाठी फक्त वाहणारे पाणी असेल पण शेतकऱ्यासाठी सर्व काही आहे.” असे लिहले आहे. या व्हिडीओला लाखो व्ह्यूज गेले असून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया यावर देत आहेत.