Brother gifted 15 lakhs house to sister video: बहीण भावाचं नातं अगदी जगावेगळं असतं. यात प्रेम, माया आणि आपुलकी अशा सगळ्याच भावना असतात. अनेकदा या गोड नात्यातही भांडणं होतात, पण ती फक्त तात्पुरतीच असतात. आपल्या भावंडांच्या प्रेमापुढे अनेक गोष्टी अगदी शुल्लक वाटू लागतात.
घरात अनेकदा भावामुळे काही वाद झाला तर बहीण पुढे येऊन त्याला वाचवते. तर बहिणीला कधी कोणी त्रास दिला तर तिच्या संरक्षणासाठी भाऊ कायम तिच्यापुढे येऊन उभा राहतो. असं हे भावा-बहिणीचं नातं अगदी गोड असलं तरी आजकाल या नात्यामध्ये दुरावा निर्माण होत चालला आहे. पैशासाठी, प्रॉपर्टीसाठी भावंडं एकमेकांशी भांडू लागले आहेत. या कलीयुगात पैशासाठी या नात्याची किंमत झाली असताना एका भावाने सगळेच भाऊ सारखे नसतात हे दाखवून दिलं. सोशल मीडियावर या भावाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात त्याने बहिणीला लाखमोलाचं गिफ्ट दिलंय.
हेही वाचा… ‘उ अंटवा’ गाण्यावर थिरकले नवरीचे आई-बाबा, लेकीच्या लग्नात केला जबरदस्त डान्स, पाहा VIDEO
े
भावाने बहिणीला दिलं लाखमोलाचं गिफ्ट
सोशल मीडियावर व्हायरल झालेला भावा बहिणीचा हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील. या व्हिडीओमध्ये सगळ्या कुटुंबासमोर एक भाऊ आपल्या बहिणीला बोलवतो आणि म्हणतो, तुझी इच्छा होती की, “तुला घर घेण्यासाठी पंधरा लाख रुपयांची जागा हवी होती. ती इच्छा मी आज पूर्ण केली”, असं म्हणून भाऊ बहिणीला पंधरा लाखांचं घर गिफ्ट करतो. हे ऐकताच बहिणीचे अश्रू अनावर होतात, ती भावाला मिठी मारून रडू लागते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @maharashtra_udyog_kranti या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “भावाने दिले बहिणीला पंधरा लाखाचे घर गिफ्ट. कर्म चांगले असले की देवही विचार करतोच”, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ३.६ मिलियन व्ह्युज आले आहेत.
हेही वाचा… “तू माझी आई गं…”, सासरी जाणाऱ्या मुलीला रडू झालं अनावर, काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच
युजर्सच्या प्रतिक्रिया
भावा बहिणीच्या नात्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “दादा तू खूपच मोठ्या मनाचा आहेस. बहिणीच्या पाठीमागे असाच उभा राहा.” तर दुसऱ्याने “लय भारी भावा… तुझ्या आयुष्यात तुला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “असा भाऊ प्रत्येक बहिणीला भेटू दे” एकाने “असा भाऊ भेटायला नशीब लागतं” अशीदेखील कमेंट केली.
© IE Online Media Services (P) Ltd