Emotional video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. जगातील कुठल्याच नात्यात जेवढी ओढ नसते तेवढी ओढ आई-वडील आणि मुलांमध्ये असते. आई-बाबा हे आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतो. आयुष्यात कितीही मोठ्या संकटाची लाट येऊ देत, आई-बाबा हे किनाऱ्यासारखे भक्कम उभे असतात. असं म्हणतात, आईशिवाय घर अपुरं असतं आणि बापाशिवाय आयुष्य. याचंच उदाहरण देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामधल्या चिमुकल्यांचा संघर्ष पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. चिमुकल्यांची अवस्था पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले आहे.

आई वडील हे प्रत्येकाच्या आयुष्यातील त्या व्यक्ती असतात ज्यांचे उपकार आपण आयुष्यभर फेडू शकत नाही. आपल्या आनंदासाठी ते वाट्टेल ते करतात. मुलांना सुख मिळावे आणि भरपूर यश मिळावे, म्हणून सतत प्रार्थना करतात. पण ज्यांच्याकडे आई-वडिलच नाहीत त्यांचं काय? आई-वडिलांशिवाय जगण्याचा विचारही कोणी करु शकत नाही. मात्र या चिमुकल्यांच्या वाट्याला हे दु:ख आलंय. आपल्याला माहिती आहे, आई-वडील आपल्या मुलांना मोठं करताना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन मुलं आई-वडिलांचं नाव मोठं करतात. मात्र, ज्यांच्या आयुष्यातला हा भक्कम आधारच गेला तर.., कुटुंबातून बाप गेल्यावर काय परिस्थिती होते कुटुंबाची हे त्या कुटुंबालाच ठाऊक असतं. आयुष्य हे फक्त आनंदी राहणे, हसणे किंवा मजा-मस्ती करण्यापुरते मर्यादित नसते. आयुष्यात कधी कधी थोडे दुःख संघर्ष आणि भरपूर कष्ट सहन करावे लागतात. कोणाची आर्थिक परिस्थिती चांगली असते तर कोणाची नसते. ही परिस्थिती प्रत्येक व्यक्तीला खूप काही शिकवते. जी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीला सामोरी जाते तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने घडते. परिस्थिती व्यक्तीला जगायला शिकवते.

Ajit Pawars trusted Bhausaheb Bhoir rebelled deciding to contest Chinchwad elections independently
चिंचवड : अजित पवारांच्या पक्षातून बंडखोरी; ‘या’ नेत्याने केला अपक्ष लढण्याचा निर्धार
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Learn to express gratitude, mistakes, gratitude,
सांधा बदलताना : चुकांचा स्वीकार
Commercial Pilot License Holder ppl Cpl airplan career news
चौकट मोडताना: अनुभवानंतरचे शहाणपण
Ikra predicts that banks will raise funds through bonds as growth in bank deposits slows
बँकांची रोख्यांवर मदार, ठेवीतील वाढ मंदावल्याने पाऊल; १.३ लाख कोटींच्या निधी उभारणीचा इक्राचा अंदाज
Shocking video Brave Mother Saved his Kid from Stray Dogs in Karimnagar Telagana
VIDEO: “शेवटी विषय काळजाचा होता” कुत्र्यांच्या तोंडी स्वत:चा जीव दिला, पण बाळाला आईनं कसं वाचवलं पाहा
Mehbooba mufti india gandhi and supriya sule
International Daughters Day : इंदिरा गांधी ते सुप्रिया सुळे; आई-वडिलांचा राजकीय वारसा जपणाऱ्या राजकन्या!
parents children self reliant chaturang article
सांदीत सापडलेले : काळजी

आयुष्यात एक वेळ पैसा नसेल तरी चालेल मात्र आई बाप पाहिजे हेच तुम्हीही हा व्हिडीओ पाहून म्हणाल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, बाहेर काही पायऱ्यांवर तीन चिमुकली मुलं दिसत आहेत. तिघांनाही झोप आली आहे, मात्र झोपायला जागा नाहीये. यावेळी यातील एक मुलगा आपल्या लहान बहिणीला नीट झोपवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून आपण किती नशीबवान आहोत याची जाणीव होते.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “गर्व कशाचा करता? वेळ बदलायला वेळ लागत नाही” सिंहाची अवस्था पाहून तुमच्याही जगण्याचा दृष्टीकोन बदलेल

सोशल मीडियावर हा व्हिडीओ kutuhal.news नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं प्रतिक्रिया देत परिस्थिती सगळं काही शिकवते असं म्हंटलंय. तर आणखी एकानं, “आहे तोपर्यंत किंमत करा आठवण आभास देते स्पर्श नाही” अशी प्रतिक्रिया दिली आहे.