Emotional Video: बाप आणि लेकाचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्यासारखा आपल्या लेकाला जपणारा हा बाप अनेक संकटांना सामोरा जात असतो. अगदी जन्म दिल्यापासून ते मोठं होईपर्यंत बाप आपल्या लेकाला सांभाळण्याची, त्याचं रक्षण करण्याची आपली जबाबदारी कधीच विसरत नाही. लहान-मोठ्या सगळ्या संकटांत तो आपल्या मुलांबरोबर खंबीरपणे उभा राहतो. सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात मुलाला अॅम्ब्युलन्समधून घेऊन जाण्यासाठी बापाकडे पैसे नव्हते म्हणून त्यानं उशीर न करता बाईकवरून मुलाला नेलं. नेमकं काय घडलं ते पाहा…
बापाची मुलासाठी तळमळ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. या व्हिडीओमध्ये एका बापाची घालमेल दिसत आहे. रुग्णालयातील स्ट्रेचरवर निपचित पडलेल्या आपल्या लेकाला अॅम्ब्युलन्समधून घेऊन जाण्यासाठी १० हजार रुपये मागितल्यानं बापानं मुलाला उचललं आणि बाईकवर बसवून ९० किलोमीटर प्रवास केला.
गरीब बापाकडे फार पैसे नसल्यानं ही वेळ आली होती. बापाची मुलासाठीची ही तळमळ पाहून अनेकांचे डोळे पाणावले.
बापाच्या या तळमळीचा हा धक्कादायक व्हि़डीओ @lay_bhari_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘अॅम्ब्युलन्ससाठी १० हजार रुपये मागितले म्हणून वडिलांनी मुलाला गाडीवर घेऊन ९० किमी प्रवास केला’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “सत्य परिस्थिती… लूटमार चालू आहे.” दुसऱ्यानं “किती मोठं दुःख… एक बाप खांद्यावर घेऊन जातोय, काय वाटत असेल त्याच्या जीवाला,” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “सरकारने अॅम्ब्युलन्स मोफत किंवा किलोमीटरला दर ठरवून उपलब्ध करून देण्याची सक्ती करावी.” एकानं, “लोकांना फुकटच्या स्कीम देण्यापेक्षा या सुविधा द्या,” अशीदेखील कमेंट केली.