Children Emotional Video : बालपण हे फार निरागस असतं, खेळण्या-बागडण्याचे हे वय असते. या वयातच मुलांना अनेक चांगल्या गोष्टी पाहता येतात, अनुभव घेता येतो, अनेकांचे प्रेम, माया मिळते. शिक्षण घेत पुढे आयुष्य घडवण्याचे हे वय असते. पण, घरात अठराविश्व दारिद्र्य आणि पैशांसाठी अनेक लहानग्यांना कामात जुंपल्याचे विदारक दृश्य बऱ्याचदा पाहायला मिळते. या गरिबीमुळे शिक्षण घेण्याची इच्छा असूनही अनेक लहानग्यांना मोलमजुरी करावी लागते. अशात भीषण परिस्थितीची जाणीव करून देणारा एक अतिशय भावनिक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुमच्याही डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
या व्हिडीओत एक चिमुकला खेळण्याच्या आणि शिक्षण घेण्याच्या वयात खांद्यावर जबाबदारीचे ओझ घेत आपलं आयुष्य जगताना दिसतोय. एका शाळेत बालमजुरी करणारा हा चिमुकला आसूसलेल्या डोळ्यांनी विद्यार्थ्यांकडे पाहतोय. त्यालाही विद्यार्थ्यांप्रमाणे खेळायचे, शिकायचेय, पण परिस्थितीमुळे तो या सर्व गोष्टींपासून फार दूर असल्याचे चित्रण यातून होते. अनेकांना हे दृश्य पाहून डोळ्यात पाणी आले.
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका शाळेत बांधकाम सुरू आहे, यावेळी तिथे ठेवलेल्या विटांवर उभा राहून मजुरी करणाऱ्या कामगाराचा लहान मुलगा शाळेत खेळणाऱ्या विद्यार्थ्यांकडे आसूसलेल्या नजरेने पाहतोय. त्यालाही शाळेत जायचेय, त्या विद्यार्थ्यांसारखे शाळेचे कपडे घालून खेळायचेय, अभ्यास करायचाय पण परिस्थितीसमोर तो हतबल आहे, गरिबीमुळे त्याला शाळेत जाता येत नाहीये. त्यामुळे विद्यार्थ्यांकडे पाहत राहण्याशिवाय आता त्याच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही, यातून गरिबी आणि श्रीमंतीमध्ये असलेली एक दरी स्पष्टपणे दिसून येतेय. यातून अनेक जण देवा ही गरिबी नको रे कोणाला, असे म्हणत आहेत.
हा भावनिक व्हिडीओ @pranaveditz_नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्यावर अनेकांनी कमेंट्स करत चिमुकल्याची ही परिस्थिती पाहून दु:ख व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले की, बस, यांच्यासाठीच श्रीमंत व्हायचं आहे, दुसऱ्या एका युजरने लिहिले की, गरिबी अशी गोष्ट आहे, जी वय नाही पाहत.. खेळण्याच्या वयात जबाबदारीचं ओझं खांद्यावर येतं. तिसऱ्या युजरने लिहिले की, हा फरक पाहून डोळ्यात पाणी येते यार. चौथ्या एका युजरने लिहिले की, अशी वेळ कोणावरच येऊ नये..