Couple Emotional Video: आयुष्यात आपल्या मनासारखा योग्य जोडीदार मिळायला नशीब लागतं, असं म्हणतात. आपल्या सुख-दुःखांत साथ देणारा जोडीदार भेटला की, सगळ्या संकटांना सामोरं जायला आपोआप बळ मिळतं. आपल्या आवडीच्या माणसाचा क्षणभर सहवास जरी लाभला तरी तो हवाहवासा वाटतो. या नात्यात फक्त प्रेम आणि प्रेमाची अपेक्षा असते. आणि दोन्ही बाजूंनी प्रेम जर समान असेल, तर आयुष्याचा प्रवास सुखकर होतो.

प्रत्येक नातं जपायला थोडी अधिकची मेहनत घ्यावीच लागते. लहान-सहान गोष्टींनी आपल्या त्या नात्याला फुलवणं गरजेचं असतं. सुखाच्या वेळी तर जोडीदार आपल्या जवळ असतोच; पण दु:खाच्या आणि कठीण काळात जोडीदार आपल्याबरोबर असला की, जग जिंकल्यासारखं वाटतं. आजकाल नाती जपायला अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यात हल्ली गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचं नात हे जास्त काळ टिकत नाही. पण जर प्रेम खरं असेल, तर आयुष्यभर तोच जोडीदार शेवटपर्यंत असतो.

Viral Video Of Girls Hostel
आनंदच निराळा…! अंघोळीसाठी रांगा, केसांत ब्रश अन्… VIRAL VIDEO पाहून डोळ्यांसमोर येईल तुमची ‘हॉस्टेल लाईफ’
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
ladies group dance on Hoti Hai Peelings Hoti Hai Feelings song video goes viral on social media
“होती है फीलिंग्स होती है फीलिंग्स” म्हणत चाळीतल्या महिलांचा तुफान डान्स; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
A groom breaks down in tears as he watches his bride cry
नवरीला रडताना पाहून नवरदेवही रडला! VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “नशीबवान आहेस ताई तू…”
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
an old lady amazing dance in grand daughters wedding
आज्जी असायला नशीब लागतं! नातीच्या लग्नात आज्जीने केला भन्नाट डान्स, VIDEO एकदा पाहाच
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा

हेही वाचा… अरे जनाची नाही, मनाची तरी…, तरुणीने भररस्त्यात साडी सोडली अन् पुढे ‘असं’ काही झालं की…, VIDEO झाला व्हायरल

सोशल मीडियावर अनेकदा अशाच गर्लफ्रेंड-बॉयफ्रेडच्या प्रेमाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे तुम्ही पाहिले असतील. ज्यात कपल्स कोणत्या बीचवर, तर कुठे गार्डनमध्ये बसलेले दिसतात. पण सध्या एका अशा कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जे चक्क रस्त्याच्या कडेला बसून जेवतायत. नेमका व्हिडीओ काय आहे. जाणून घेऊ…

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी या जोडीचं कौतुक केलं आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक कपल रस्त्याच्या कडेला बसून जेवतेय. भरउन्हात गाड्यांची वर्दळ असताना ती मुलगी त्याची साथ द्यायला अगदी रस्त्याच्या कडेला बसली आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.

हा व्हायरल व्हिडीओ @sath_tuzya_premachi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “सगळ्या मुली सारख्या नसतात. हे खरं आहे. जर एखाद्या मुलीनं जीव लावला ना, तर ती मुलगी कोणत्याही परिस्थितीत साथ देते” अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. तसंच या व्हिडीओला तब्बल १.३ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… मुंबई लोकलमध्ये कपलचे अश्लील चाळे, प्रवाशांसमोर केलं ‘असं’ काही की…, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडचा VIDEO व्हायरल

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करीत लिहिलं, “अशी मुलगी भेटायला नशीब लागतं.” तर दुसऱ्यानं “अशी जीवाला जीव लावणारी मुलगी भेटणं खूप अवघड आहे” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करीत म्हणाला, “अशा खूप कमी मुली आहेत.” “खरं प्रेम करणारी मुलगी आयुष्यात मरेपर्यंत साथ देते” अशीदेखील कमेंट एकानं केली. “खरंच भावा, तू खूप नशीबवान आहेस की तुला अशी मुलगी भेटली” असं एक जण म्हणाला.

Story img Loader