Emotional Video: सोशल मीडियावर लहान मुलांचे असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ मजेशीर असतात; तर काही व्हिडीओ पाहिल्यावर डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहत नाही. असे व्हिडीओ आपल्याला आयुष्यात खूप गोष्टी शिकवून जातात. आपल्याकडे नसलेल्या गोष्टींकडे पाहून रडत बसण्यापेक्षा असलेल्या गोष्टींमध्ये समाधान कसं मानायचं हे अशा व्हिडीओकडे बघून कळतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जबाबदारी माणसाला सगळं काही शिकवते, असं म्हणतात. त्यात गरिबी वाट्याला आली की, मेहनत व अथक परिश्रमांशिवाय कुठलाच पर्याय उरत नाही. आपली पोटाची खळगी भरण्यासाठी अनेक जण दररोज जीवाचं रान करतात आणि आपली भूक भागवतात. त्यात आई-वडिलांची साथ नसली की, अगदी लहानपणीच सगळ्या गोष्टींची जबाबदारी घ्यावी लागते आणि कष्ट करावे लागतात. ज्या वयामध्ये मनमुराद खेळायचे-बागडायचे, ज्या वयात पेन, पेन्सिल, पुस्तके, वह्या असायला हव्यात त्या वयात ही मुलं भूक भागविण्यासाठी काम करत असल्याचं विदारक चित्र जेव्हा दिसतं, तेव्हा हेलावल्यासारखं होतं. सध्या अशाच परिस्थितीबरोबर जीवनसंघर्ष करणाऱ्या एका लहान मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

हेही वाचा… “लग्नात सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पण…”, नात आणि आजोबांचा ‘हा’ VIDEO पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

भूक भागवण्यासाठी जीवघेणी धडपड

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा समुद्राच्या मधोमध एका मोठ्या बोटीला पकडून उभा असल्याचं दिसतंय. तोही एका लहानशा बोटीत आहे, ज्यात काही शहाळी ठेवलेली दिसत आहेत. पोटाची भूक शमविण्यासाठी या शहाळ्यांच्या विक्री व्हावी म्हणून त्याची ही जीवघेणी धडपड चालू असल्याचं दिसतंय.

लहान मुलाचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ @gavran_tadka1122 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, ‘जबाबदारी बालपणही हिरावून घेते’, अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच त्याला तब्बल एक दशलक्ष व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… प्रेमात धोका, घाणेरड्या कमेंट्स की आणखी काही…, १९ वर्षीय तरुणीची इन्स्टाग्राम लाइव्हवर आत्महत्या!

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपापल्या भावना व्यक्त केल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “जबाबदारीपुढे सगळ्यांनाच झुकावं लागतं.” दुसऱ्यानं, “हा मोठा होऊन काहीतरी बनणार बघा,” अशी कमेंट केली. एक जण कमेंट करीत म्हणाला, “याला आई-बापाच्या कष्टांची जाणीव आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emotional video of a kid selling coconuts from boat hardworking child video viral on social media dvr