Little Boy viral video: सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ मजेशीर, तर काही व्हिडीओ पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो. असे व्हिडीओ आपल्याला आयुष्यात खूप गोष्टी शिकवून जातात. आपल्याकडे नसलेल्या गोष्टींकडे पाहून रडत बसण्यापेक्षा असलेल्या गोष्टींमध्ये समाधान कसं मानायचं हे अशा व्हिडीओकडे बघून कळतं.

जबाबदारी माणसाला सगळं काही शिकवते असं म्हणतात. त्यात गरिबी वाट्याला आली की मेहनत आणि अथक परिश्रमांशिवाय कुठलाच पर्याय उरत नाही. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी अगदी वयाचा विचार न करता आपल्याला पोसणारे पालक जवळ नसले की लहान मुलं पडेल ते काम करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात एक लहानगा भरउन्हात अनवाणी आपल्या पाठीवर भार घेऊन मेहनत करताना दिसतोय.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
bride told love story through ukhana
“पहिल्याच भेटीत लग्नासाठी नाही म्हटले ..” उखाणा घेत नवरीने सांगितली भन्नाट लव्हस्टोरी, VIDEO एकदा पाहाच
Video of Nagpur Mr Calendar kaka
नागपूरच्या ‘कॅलेंडर’ काकांना तोंडपाठ आहे संपूर्ण कॅलेंडर; अचूक सांगतात माहिती, VIDEO एकदा पाहाच
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
small girls in the street
‘मोठा मॅटर झाला…’ गल्लीतल्या दोन मुलींचं झालं भांडण; एकमेकींना धमकी देत असं काही म्हणाल्या… VIDEO पाहून हसाल पोट धरून
emotional video of Husband wife supporting each other in bad phase viral video on social media
साथ निभावणारे परिस्थिती बघत नसतात! वाईट काळातही त्याच्याबरोबर उभी राहिली, नवरा-बायकोचा ‘हा’ VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील

हेही वाचा… जरा तरी भान ठेवा…, शिक्षिकेने भरवर्गात केली हद्दच पार, VIDEO पाहून नेटकरी संतप्त

व्हायरल व्हिडीओ

व्हिडीओमध्ये मुलाची ही मेहनत पाहून सगळ्यांचेच अश्रू अनावर होतील. यात एक लहान मुलगा आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी अपार कष्ट घेताना दिसतो. टेम्पोमधून कांद्याची भली मोठी पिशवी आपल्या खांद्यावर घेऊन दुसऱ्या ठिकाणी ठेवण्यासाठी तो हा भार सोसत चालत जाताना दिसतोय. भरउन्हात पायात चप्पल न घालता तो इतकं काम करतोय. एवढ्या लहान वयातही कष्ट आणि मेहनत करण्याची त्याची हिंमत पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं आहे.

व्हिडीओची लिंक

https://www.instagram.com/reel/DC4NOFCTdo7/?igsh=M2lxbnhwcHRlczA4

हा व्हायरल व्हिडीओ @deepakyadav9087 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “जबाबदारी माणसाला वयाच्या आधीच मोठं करते” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलं आहे.

हेही वाचा… “अशा भक्तीचा काय फायदा…”, दुसऱ्याला दु:ख देऊन स्वत: घेतायत आनंद, हा VIDEO एकदा पाहाच

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “परिस्थिती माणसाला सगळं काही शिकवते”, तर दुसऱ्याने “लहान वयातच त्याला जबाबदारीची जाणीव झाली” अशी कमेंट केली आहे.

हेही वाचा… …आणि मुलगा म्हणतो बापाने माझ्यासाठी काय केलं? वृद्ध वडिलांचा ‘हा’ VIDEO पाहून डोळ्यात येईल पाणी

दरम्यान, याआधीही असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत, जे पाहून अनेकांचे डोळे पाणावले असतील. सध्या व्हायरल झालेला लहान मुलाचा हा व्हिडीओही चर्चेत आहे.

Story img Loader