Bride to be Emotional Video: प्रत्येक मुलीला आपल्याला योग्य जोडीदार मिळावा आणि पुढील आयुष्य सुखकर व्हाव असं वाटत असतं. पण, त्या मुलीसाठी माहेर सोडून सासरी जाण्याची भावना जितकी आनंद देणारी असते तितकीच दुःखाचीही असते. कारण ती आपलं माहेर, आपल्या आठवणी सगळंच सोडून पुढील वाटचालीकडे निघाली असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतकी वर्ष आपल्या आई-वडिलांबरोबर राहिलेली लेक त्यांना सोडून जाण्याच्या विचाराने घाबरीघुबरी होते आणि तिची तळमळ फक्त तिला आणि त्या आईबापालाच कळत असते. अनेकदा लग्नातील आई बापाच्या आणि लेकीच्या नात्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे, जो पाहून तुमचेही डोळे पाणावतील.

हेही वाचा… ‘उ अंटवा’ गाण्यावर थिरकले नवरीचे आई-बाबा, लेकीच्या लग्नात केला जबरदस्त डान्स, पाहा VIDEO

साखरपुड्यालाच झाली भावूक

सोशल मीडियावरील हा व्हायरल व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये नववधू होणाऱ्या तरुणीने साखरपुड्यादिवशी आपल्या बहिणींबरोबर खास डान्स परफॉर्मन्स केला आहे. ‘तू माझी आई गं मी तुझाच लेकरू’ या गाण्यावर ती आई-बाबांकडे पाहून डान्स करताना दिसतेय. पण, हा डान्स करताना त्या तरुणीचे अश्रू अनावर झाले आणि ती डान्स करता करता ढसाढसा रडू लागली. तिला पाहून तिच्या आई-बाबांनाही राहवलं नाही आणि त्यांच्याही डोळ्यातून पाणी आलं.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @pranukap12 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “साखरपुड्याचा डान्स” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल ५.२ मिलियन व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… पुणेकरांचा विषय हार्ड! शेतात लावली अशी पाटी की पुढे जायची कोणी हिंमत करणार नाही; वाचून पोट धरून हसाल

युजर्सच्या प्रतिक्रिया

नववधू होणाऱ्या या तरुणीचा डान्स पाहून अनेकांचे डोळे पाणावले. या व्हिडीओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “खूप कठीण आहे हा प्रसंग.” तर दुसऱ्याने “रडवलस बाळा तू खरंच” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “खूप छान, बोलायला शब्दच नाहीत”, “प्रत्येक मुलीच्या आयुष्यातला आनंदाचा पण दुःखाचा क्षण आहे हा” अशीही कमेंट एकाने केली.

हेही वाचा… “मुलगी काळी…”, नवरदेवाने घेतला जगात भारी उखाणा, VIDEO पाहून कराल कौतुक

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emotional video of bride to be who cried on engagement while dancing video viral on social media dvr