Father Kid Video: बाप आणि लेकाचं नातं अगदी खास असतं. काळजाच्या तुकड्यासारखा आपल्या लेकाला जपणारा हा बाप अनेक संकटांना सामोरा जात असतो. अगदी जन्म दिल्यापासून ते मोठं होईपर्यंत बाप आपल्या लेकाला सांभाळण्याची, त्याचं रक्षण करण्याची आपली जबाबदारी कधीच विसरत नाही.
लहान-मोठ्या सगळ्या संकटात तो आपल्या मुलांबरोबर खंबीरपणे उभा राहतो. पण, सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात बापाची ही कृती पाहून अनेक जण संतप्त झाले आहेत.
बापाचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. या व्हिडीओत एका बापावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे, कारण त्याची ही कृती अनेकांना विचार करायला लावणारी आहे. या व्हिडीओमध्ये दिसून येतंय की, एक बाप त्याच्या लेकराला बाईकवरून घेऊन जातोय. बाप गाडी चालवत असताना हे तान्ह बाळ पुढे झोपल्याचं दिसून येतंय. आणि हे खूपच असुरक्षित वाटत आहे. व्हिडीओची चर्चा सुरू असताना अनेकांनी यावर संमिश्र प्रतिक्रिया दिल्याचं दिसतंय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @abnewsmarathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “काय म्हणावे अशा बापाला?” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला ३ लाखांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “परिस्थितीला झुंज देत स्वत:चे भविष्य, स्वत:चे काळीज सोबत घेऊन मजबूर बापमाणूस ..” तर दुसऱ्याने “बाप आहे तर जग आहे” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “मजबुरी आहे कठीण प्रसंगातून मार्ग काढतोय बाप” तर एकाने “जो पर्यंत गाडी वर बाप आहे तो पर्यंत बाळाला काही होऊ नाही शकत” अशी कमेंट केली.
तर अनेकांनी संतप्त होऊन प्रतिक्रिया दिल्या आहेत. “कुठेतरी थांबवून अडचण दूर करायला हवी होती, हे म्हणजे स्वत:च्याच लेकराला जीव धोक्यात टाकण्यासारखं आहे.” अशी कमेंट एका संतप्त युजरने केली.