Father Emotional Video: बाप होणं काही सोप नसतं हे म्हणतात ते खरंच. बाप झाल्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं कळतं. आपल्या लेकरांसाठी धडपडणारा बाप अनेकदा दु:ख मनात ठेवून, त्यांच्यासाठी झिजत असतो. सकाळी कामावर जातो आणि थकून भागून रात्री घरी येतो. आपल्या लेकरांचं भविष्य उज्ज्वल व्हावं हे प्रत्येक बापाला वाटत असतं. म्हणून त्याची दिवस-रात्र धडपड सुरूच असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरासाठी झिजणारा हा बाप बाहेर जाऊन किती कष्ट घेतो, हलाखीच्या दिवसांत पोटाची खळगी भरावी यासाठी किती मेहनत घेतो हे कधी कधी त्याच्या कुटुंबालाही माहीत नसतं. सध्या बापाचा हृदय पिळवटणारा एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एक बाप अखंड मेहनत घेताना दिसतोय. तो पाठीवर विटांचा भार सोसताना दिसतोय.

हेही वाचा… सरकत्या जिन्यांवर चढली अन् करू लागली विचित्र प्रकार, शेवटी दोन माणसं आली अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं?

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झलेल्या या व्हिडीओमध्ये एक माणूस मोठमोठ्या चार ते पाच विटांचं ओझं आपल्या पाठीवर उचलून घेऊन जाताना दिसत आहे. विटा पाठीवरून नेत असताना अचानक एक वीट त्याच्या डोक्याला आपटून खाली पडते. एवढं होऊनही तो पाठीवरील भार तसाच घेऊन आपलं काम सुरूच ठेवतो.

https://www.instagram.com/reel/C_irsJavdgv/?igsh=MXFzMmY3ZGYyeTdneg%3D%3D

व्हायरल झालेला हा @mr_vikash_1.3 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘एक पिता की मजबुरी, बच्चे बोलते है की, क्या किया मेरे बाप ने’ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यापासून त्याला ४० हजारांपेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत. यादरम्यान हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे कळलेले नाही.

हेही वाचा… VIDEO: प्रेम काहीही करायला लावतं! बायको छतावरून कोसळली म्हणून नवऱ्याने केलं असं काही की…, पाहा नेमकं काय घडलं

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी त्यावर आपल्या भावूक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “वडील हे जगातले खरे हीरो आहेत.” दुसऱ्यानं कमेंट करीत लिहिलं, “एक वडीलच समजू शकतात घराची जबाबदा.री” तिसऱ्यानं हृदयस्पर्शी व्हिडीओ, अशी कमेंट केली. तर काहींनी त्यांच्या आणि वडिलांच्या नात्याबद्दल कमेंट्स सेक्शनमध्ये लिहिलं आहे.

हेही वाचा… आयुष्यापेक्षा झोप महत्त्वाची! गाढ झोपले होते अन् घोरपड घरात घुसली, पुढे जे झालं ते पाहून काळजाचा ठोका चुकेल, पाहा VIDEO

दरम्यान, सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ याआधीही व्हायरल झाले आहेत. त्यात कुठे बापाची माया, तर कुठे त्याची मेहनत दिसली आहे. सध्या व्हायरल झालेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emotional video of father went viral on social media shows dads hard work dvr