Emotional Video: आजोबा आणि नातवंडांचं नात अगदी खास असतं. जे हट्ट आपले आई वडिल पुरे करत नाहीत ते आजोबा करतात. आजोबा जरा जास्तच प्रेम आणि लाड करतात. आई-वडिलांचा मार खाण्यापासून वाचवण्यापर्यंत ते गुपचूप पैसे देण्यापर्यंत आजोबा आपल्या नातवंडांच्या कायब सोबत असतात. अनेकदा जे आपण आपल्या आई वडिलांना सांगू शकत नाही ते आपण आपल्या आजी-आजोबांना सांगतो. असं हे आजोबा आणि नातवंडांचं नाद अगदी जगावेगळं असतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जेव्हा नात आयुष्याच्या नव्या प्रवासासाठी संसार करण्यासाठी आपलं घर सोडून दुसऱ्या घरी जाणार असते तेव्हा जेवढा आई वडिलांना त्रास होतो तेवढाच त्या आजोबांनादेखील होतो. सध्या असाच एक नातीच्या आणि आजोबाच्या नात्याच्या एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात आजोबा नातीच्या लग्नात भावूक झालेले दिसतायत.

हेही वाचा… प्रेमात धोका, घाणेरड्या कमेंट्स की आणखी काही…, १९ वर्षीय तरुणीची इन्स्टाग्राम लाइव्हवर आत्महत्या!

नात आणि आजोबांचं प्रेम

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपल्या नातीच्या लग्नात आजोबा भावूक झालेले दिसतायत. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आहेत आणि नात त्यांना सावरताना दिसतेय. संपूर्ण व्हिडीओत नातीचं आजोबांशी असलेलं खास नात दाखवण्यात आलं आहे. प्रेमाने नात आपल्या आजोबांना जवळ घेत मायेचा हात फिरवताना दिसत आहे.

नात आणि आजोबांचा व्हायरल झालेला हा व्हिडीओ @weddings__vibes या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, “लग्नात सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या पण आजोबासोबत हा क्षण जगण्याची इच्छा अपूर्णच राहिली” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला ८ लाखापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

हेही वाचा… VIDEO: महिलांनो काचेच्या बांगड्या हातातून काढताना तुटतात का? मग ‘ही’ जबरदस्त ट्रीक पाहा, कधीच हाताला बांगडी लागणार नाही

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “खरच आपले पांडुरंग माऊली म्हणजे आपले आजी आजोबा असतात” तर दुसऱ्याने “प्रत्येक जण एवढे नशीबवान नसतात” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “डोळ्यात अश्रू आले, माझ्या आजोबांची इच्छा होती माझ्या लग्नात सोन्याची फुल उधळायची पणं स्वप्न ते स्वप्न राहील”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Emotional video of grandfather during granddaughter wedding video viral on social media dvr