Mother and son Emotional Video: ‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ असं म्हटलं जातं, कारण आईची पोकळी आयुष्यात कोणीच भरून काढू शकत नाही. आई तिच्या मुलांवर खूप प्रेम करते, माया करते; त्यांना ती स्वत:पेक्षा जास्त जपते. स्वत: हालअपेष्टा सहन करून त्यांना लहानाचं मोठं करते. त्यांना चांगलं शिक्षण मिळावं, त्यांचे सर्व हट्ट पूर्ण करता यावेत यासाठी दिवस-रात्र झटणारी आई खूप कमी मुलांना कळते. आईने केलेले कष्ट ज्या लेकराला कळतात तोच आईचा आदर करतो.

वय झालं की जी मुलं आईचा आधार बनतात, तिचा सांभाळ करतात त्यांनाच तिने केलेल्या कष्टांची जाणीव असतो. आईवर अफाट प्रेम करण्यारी मुलं जगात आहेतच पण तिचा सांभाळ शेवटपर्यंत करणारी थोडी कमीच आहेत. सध्या आई आणि लेकाचा एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीही भारावून जाल.

आईसाठी त्याने काय केलं पाहा…

आई आणि लेकाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एक मुलगा आपल्या आईबरोबर स्कूटरने इच्छित स्थळी जात आहे. मुलगा स्कूटर चालवतोय तर आई मागे झोपली आहे. आईला काही त्रास होऊ नये, तिची झोप नीट व्हावी यासाठी मुलाने आईला एका हाताने पकडलं आहे आणि दुसऱ्या हाताने तो स्कूटर चालवताना दिसतोय. अगदी तिला सांभाळत तिची काळजी घेत तो गाडी चालवतोय. या व्हिडीओतून आई आणि मुलाचं प्रेम कळून येतंय.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ या @zindagi.gulzar.h या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “जगात सर्व काही पुन्हा मिळेल पण आई-वडील कधीच भेटणार नाहीत.” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल होताच याला ५ लाखांच्यावर व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, ” लहान असताना आई आपली काळजी घ्यायची, आता तिची काळजी घेण्याची जबाबदारी आपली आहे.” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “खूपच छान” तर तिसऱ्याने “आई म्हणजे निसर्गाने माणसाला दिलेली सर्वात मौल्यवान भेट, खूप भावनिक दृश्य” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “या जगात आईवडिलांपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही. आईची किंमत ज्याला कळली तोच खरा मुलगा”

Story img Loader