Emotional Video: आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी जो तो दिवसरात्र झटत असतो, मेहनत करत असतो. यासाठी अनेक जण लहान मोठा व्यवसाय करतात. छोटीशी टपरी, ठेला किंवा दुकान उभारतात आणि कमाई करतात.

रस्त्यालगत आपला ठेला चालवणारी ही माणसं अगदी कष्टानं भरउन्हात उभे राहून आपला छोटासा कारभार चालवतात. पण, काम सुरू होण्यापूर्वीच जर एखाद्याचं भलमोठं नुकसान झालं तर त्याचं खूप वाईट वाटतं. सध्या अशीच एक घटना एका छोले कुलचे विक्रेत्याबरोबर झाली आहे आणि याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुम्हीलाची त्या माणसाची दया आल्याशिवाय राहणार नाही. व्हायरल व्हिडीओमध्ये एक माणूस छोले कुलचेचा ठेला घेऊन जाताना दिसतोय. पण या व्हिडीओत त्या ठेल्यावरील सगळं सामान रस्त्यावर खाली पडलेलं दिसतंय. कांदा, टॉमेटो, लिंबू, मिरची सगळंच रस्त्यावर पडलेलं दिसतंय. विक्रेता तो सायकलवर असणारा ठेला सांभाळत असतो तेवढ्यात एक माणूस त्याच्या मदतीला धावून येतो. बाजूने स्कूटरने जात असणारा माणूस त्याचा ठेला एका बाजूला लावायला मदत करतो.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ @pro_capitalmotivation07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून त्याला “संधी मिळाली तर कोणाच्यातरी हसण्याचे कारण व्हा,आयुष्यात रडवणारे लोक खूप आहेत” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला २ लाखापेक्षा जास्त व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “व्हिडीओ काढणाऱ्याला मारायला पाहिजे” तर दुसऱ्याने “वाईट वेळेत मदत केलेली कधीच वाया जात नाही” अशी कमेंट केली.