Emotional video of Truck Driver: सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ मजेशीर, तर काही व्हिडीओ पाहून काळजाचा ठोका चुकतो. असे व्हिडीओ आपल्याला आयुष्यात खूप गोष्टी शिकवून जातात. आपल्याकडे नसलेल्या गोष्टींकडे पाहून रडत बसण्यापेक्षा असलेल्या गोष्टींमध्ये समाधान कसं मानायचं हे अशा व्हिडीओकडे बघून कळतं.

जबाबदारी सगळं काही शिकवते असं म्हणतात. त्यात गरिबी असली की कष्टांचा भार अधिक जाणवतो. आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणारा घरातला कर्ता स्वत:चीच भूक भागवण्यात कमी पडतो. सध्या अशीच परिस्थिती एका ट्रकचालकाची झालीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

Shocking video Man beat up girlfriend on road video goes viral on social media
“हे कसलं प्रेम? घरी आई-वडिलांचा एक शब्दही ऐकून न घेणाऱ्या मुली बॉयफ्रेंडचा मार कसा खातात?” धक्कादायक VIDEO व्हायरल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
a unique friendship between a city bus and an auto rickshaw
Video : नेहमी भांडणाऱ्या सिटी बस अन् रिक्षावाल्याचं प्रेम पाहिलं का? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “अशी मैत्री फक्त याच शहरात दिसू शकते..”
a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Mother-Daughter Duo Gets Into Ugly Quarrel With Man Objecting To Wrong Parking In Delhi
VIDEO : “माझ्या १०० चुका, तरी तूच आत जाणार”, मायलेकीची तरुणाला धमकी, दिल्लीच्या रस्त्यावर पार्किंगवरून राडा
How to make cool your wife after a fight
Video : भांडण झाल्यावर पत्नीला शांत कसं करावं, पुरुषांनी दिले भन्नाट उत्तरं; व्हिडीओ एकदा पाहाच
shocking Video : Grandfather saves grandchild
Video : म्हणूनच घरात आजी-आजोबा असावेत! हिटरला हात लावायला गेला नातू, आजोबा धावत आले अन्… व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
Shocking Video
Video : तुफान राडा! दोन तरुणी भिडल्या अन् एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बॉयफ्रेंडसाठी..”

हेही वाचा… रीलसाठी ओलांडली मर्यादा! तरुणीने डान्स करता करता परदेशी व्यक्तीबरोबर केलं असं काही की…, VIDEO पाहून नेटकरी संतापले

व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले. या व्हिडीओमध्ये एका मेहनती ट्रकचालकाला खाण्यासाठीदेखील वेळ नसल्याचं दिसतंय. गाडी चालवता चालवता हा ट्रकचालक जेवतोय. कामामुळे वेळ मिळत नसल्याने दोन घासही सुखाचे त्याला खाता येत नाहीत. ट्रॅफिकमुळे गाडी थांबवली असताना याच ब्रेकमध्ये तो आपलं पोट भरतो आहे. जेवतानादेखील त्याचं लक्ष आजूबाजूच्या गाड्यांवर आहे.

व्हिडीओची लिंक

https://www.instagram.com/reel/DA0jIJuAuzM/?igsh=aDRrcWZubXo4cHdv

व्हायरल झालेला हा व्हिडीओ @dpemotional या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “जबाबदारी अशी गोष्ट आहे की, शांतपणे जेवायलाही देत ​​नाही.” तसंच या व्हायरल व्हिडीओला तब्बल ३.९ मिलियन व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… आधी मेट्रोतून बाहेर ढकललं मग केली शिवीगाळ, महिलांमधलं भांडण इतकं टोकाला गेलं की…, VIDEO पाहून माराल कपाळावर हात

युजर्सच्या प्रतिक्रिया

व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मुलगा होणे सोपे नाही”, तर दुसऱ्याने “सर्व पुरुषांचा आदर” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “ड्रायव्हरचं जीवन सोपे नसतं.”

हेही वाचा… बापरे! रेल्वे रुळावर उभा होता अन् मागून आली ट्रेन, पुढे जे झालं ते पाहून उडेल थरकाप, पाहा VIDEO

दरम्यान, याआधीही असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, जे पाहून अनेकांचे डोळे पाणावले असतील. सध्या व्हायरल झालेला ट्रकचालकाचा हा व्हिडीओ चर्चेत आहे.

Story img Loader