Emotional video of Truck Driver: सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ मजेशीर, तर काही व्हिडीओ पाहून काळजाचा ठोका चुकतो. असे व्हिडीओ आपल्याला आयुष्यात खूप गोष्टी शिकवून जातात. आपल्याकडे नसलेल्या गोष्टींकडे पाहून रडत बसण्यापेक्षा असलेल्या गोष्टींमध्ये समाधान कसं मानायचं हे अशा व्हिडीओकडे बघून कळतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
जबाबदारी सगळं काही शिकवते असं म्हणतात. त्यात गरिबी असली की कष्टांचा भार अधिक जाणवतो. आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसरात्र मेहनत करणारा घरातला कर्ता स्वत:चीच भूक भागवण्यात कमी पडतो. सध्या अशीच परिस्थिती एका ट्रकचालकाची झालीय, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
व्हायरल व्हिडीओ
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले. या व्हिडीओमध्ये एका मेहनती ट्रकचालकाला खाण्यासाठीदेखील वेळ नसल्याचं दिसतंय. गाडी चालवता चालवता हा ट्रकचालक जेवतोय. कामामुळे वेळ मिळत नसल्याने दोन घासही सुखाचे त्याला खाता येत नाहीत. ट्रॅफिकमुळे गाडी थांबवली असताना याच ब्रेकमध्ये तो आपलं पोट भरतो आहे. जेवतानादेखील त्याचं लक्ष आजूबाजूच्या गाड्यांवर आहे.
व्हिडीओची लिंक
https://www.instagram.com/reel/DA0jIJuAuzM/?igsh=aDRrcWZubXo4cHdv
व्हायरल झालेला हा व्हिडीओ @dpemotional या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “जबाबदारी अशी गोष्ट आहे की, शांतपणे जेवायलाही देत नाही.” तसंच या व्हायरल व्हिडीओला तब्बल ३.९ मिलियन व्ह्यूज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “मुलगा होणे सोपे नाही”, तर दुसऱ्याने “सर्व पुरुषांचा आदर” अशी कमेंट केली. तर एक जण कमेंट करत म्हणाला, “ड्रायव्हरचं जीवन सोपे नसतं.”
हेही वाचा… बापरे! रेल्वे रुळावर उभा होता अन् मागून आली ट्रेन, पुढे जे झालं ते पाहून उडेल थरकाप, पाहा VIDEO
दरम्यान, याआधीही असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, जे पाहून अनेकांचे डोळे पाणावले असतील. सध्या व्हायरल झालेला ट्रकचालकाचा हा व्हिडीओ चर्चेत आहे.