Emotional Video of woman: सोशल मीडियावर दररोज लाखो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ मजेशीर, तर काही व्हिडीओ पाहून आपल्या काळजाचा ठोका चुकतो. असे व्हिडीओ आपल्याला आयुष्यात खूप गोष्टी शिकवून जातात. आपल्याकडे नसलेल्या गोष्टींकडे पाहून रडत बसण्यापेक्षा असलेल्या गोष्टींमध्ये समाधान कसं मानायचं हे अशा व्हिडीओकडे बघून कळतं.
परिस्थिती सगळं काही शिकवते, असं म्हणतात. त्यात गरिबी वाट्याला आली की, जगणं खूपच अवघड होऊन जातं. अशा वेळी त्यांना अनेकदा नको ते काम करावं लागतं. अगदी हलाखीची परिस्थिती असेल, तर रस्त्यावर उतरून लोकांकडून भिकेची याचना करावी लागते. अनेक दिवस-रात्र उपाशी असलेलं हे पोट कसं भरता येईल यासाठी मग ते वाटेल ते करतात. सध्या असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एका महिलेनं थोड्या पैशांसाठी रस्त्यावर उतरून काय केलं ते पाहा…
महिलेचा पोटासाठी संघर्ष
महिलेचा हा व्हिडीओ पाहून तुमचेही डोळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत. या व्हिडीओमध्ये भररस्त्यात एका महिलेनं आपल्या आयुष्याची जणू सर्कसच करून घेतली आहे. रस्त्यात सगळ्यांसमोर गळ्यात रशी बांधून ती लोकांकडे मदतीची याचना करताना दिसतेय. दोन वेळची भूक भागावी यासाठी तिचा हा अट्टहास दिसतोय. दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही.
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला व्हिडीओ @vishwa_9696k या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘दोन वेळेच्या जेवणासाठी किती मेहनत करावी लागते हे तुम्हाला हा व्हिडीओ पाहून कळेल’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. या व्हिडीओला तब्बल १.४ दशलक्ष व्ह्युज आले आहेत.
युजर्सच्या प्रतिक्रिया
महिलेचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “कृपया गरीब लोकांना मदत करा”. दुसऱ्यानं कमेंट करत लिहिलं, “देवानं हात-पाय दिले आहेत, तर कुठेतरी कष्ट करून खावं ना… असं भीक मागून लोकांसमोर सर्कस करून जगण्यापेक्षा सुखाची भाकरी भेटेल. एवढं त्रास करून घेण्याची गरज च नाही ना”. तिसऱ्यानं, “ज्याच्याकडे पैसा नसतो, त्यालाच जगण्याची किंमत कळते”, अशी कमेंट केली.