Viral Video : आईवडील आणि मुलांचे नाते हे जगावेगळे आहे. या नात्यात एकमेकांविषयी प्रेम, काळजी, जिव्हाळा, आपुलकी दिसून येते. मुलांच्या आनंदासाठी आईवडील वाट्टेल ते करतात. त्याच्या सुखासाठी आयुष्यभर झटतात, कष्ट करतात. एका मुलावर आईवडिलांइतकं प्रेम कोणीही करू शकत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका तरुणाने एका व्यक्तीला प्रश्न विचारला आहे. त्या प्रश्नाचे उत्तर देताना तुम्हाला त्या व्यक्तीचे त्या मुलाविषयी असलेले प्रेम दिसून येईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे –

तरुण – तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे जिने तुमच्यावर मनापासून प्रेम केले. खूप जास्त प्रेम केले. तुमची काळजी घेतली आणि तुम्ही ज्याला कधीही गमावू शकत नाही?

व्यक्ती – मुलगा. माझा मुलगा माझी देवासारखी पूजा करतो. तो अलाहाबादमध्ये शिकतो. तेथील जे प्रोफेसर होते, त्यांनी एकदा सर्वांना विचारले, “देवाला कोणी पाहिले आहे का कोणी सांगू शकता का?” तेथील मुलांनी उडवा उडवीचे उत्तर दिले. देव कुठे असतो वैगरे पण माझ्या मुलाने काय उत्तर दिले माहितीये का? तो म्हणाला, ” देवाला मी पाहिले.” प्रोफेसरनी विचारले, “कसे?” त्यावर तो म्हणाला, “आई आणि बाबा माझे देव आहेत. जे मी मागतो, ते सर्व माझ्या आईवडिलांनी मला दिले त्यामुळे माझ्यासाठी ते देव आहेत.” हे मोठ्या अभिमानाने वडील सांगत होते. त्यांच्या बोलण्यातून मुलाविषयीचे प्रेम झळकत होते.

तरुण – खूप खूप धन्यवाद. आनंदी आहात का आयुष्यात?

व्यक्ती – मी नेहमी आनंदी राहतो. माझा मुलगा आनंदी तर मी आनंदी आहे. त्याला दु:ख असेल तर मी दु:खी आहे.

या व्हिडीओवर तुम्हाला कळेल की आईवडिलांना मुलाचे फक्त प्रेम हवे असते. ते जर प्रेम मिळाले तर आईवडील नेहमी आनंदी असतात.

पाहा व्हायरल व्हिडीओ

5ukoon या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय,
“त्याच्या मुलाने आयुष्य जिंकले” या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “सर्वात नशीबवान मुलगा आहे हा” तर एका युजरने लिहिलेय, “मला असाच मुलगा व्हायचं आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “वडील आणि मुलामध्ये खूप सुंदर बाँडिग आहे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader