Viral video: सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यामध्ये काही आपलं मनोरंजन करणारे असतात, तर काही आपल्याला भावूक करणारे. जगातील कुठल्याच नात्यात जेवढी ओढ नसते तेवढी ओढ वडील आणि मुलांमध्ये असते. बाबा हा आपल्या मुलांसाठी काहीही करू शकतो. तो एकाच नात्यात हजारो नाती निभावत असतो. आयुष्यात कितीही मोठ्या संकटाची लाट येऊ देत, बाबा हा किनाऱ्यासारखा भक्कम उभा असतो. असं म्हणतात, आईशिवाय घर अपुरं असतं आणि बापाशिवाय आयुष्य. याचंच उदाहरण देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामधल्या चिमुकल्याचा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. चिमुकल्याची अवस्था पाहून नेटकऱ्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले आहे.
आईशिवाय घर अपुरं अन् बापाशिवाय आयुष्य
आपल्याला माहिती आहे, आई-वडील आपल्या मुलांना मोठं करताना अपार कष्ट घेतात आणि मुलांना चांगलं शिक्षण देतात. हेच कष्ट डोळ्यासमोर ठेऊन मुलं आई-वडिलांचं नाव मोठं करतात. मात्र, ज्यांच्या आयुष्यातला हा भक्कम आधारच गेला तर.., कुटुंबातून बाप गेल्यावर काय परिस्थिती होते कुटुंबाची हे त्या कुटुंबालाच ठाऊक असतं. आयुष्य हे फक्त आनंदी राहणे, हसणे किंवा मजा-मस्ती करण्यापुरते मर्यादित नसते. आयुष्यात कधी कधी थोडे दुःख संघर्ष आणि भरपूर कष्ट सहन करावे लागतात. कोणाची आर्थिक परिस्थिती चांगली असते तर कोणाची नसते. ही परिस्थिती प्रत्येक व्यक्तीला खूप काही शिकवते. जी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीला सामोरी जाते तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने घडते. परिस्थिती व्यक्तीला जगायला शिकवते. सध्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
कुटुंबातून बाप गेल्यावर काय परिस्थिती होते बघाच
खेळण्याच्या वयात, आईकडे हट्ट करण्याच्या वयात हा चिमुकला घरच्यांना मदत करत आहे. कुटुंबाला मदत करताना खारीचा वाटा उचलत आहे. या वयात मुले शाळेत जाण्यासाठीही रडारड करतात, त्या वयात हा चिमुकला गॅरेजवर काम करत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, त्याचे कपडे, शरीर अतिशय मळकट झाले आहेत. काम करून तो थकला असल्याचं दिसत आहे. कोवळ्या वयात एवढे कष्ट या चिमुकल्याच्या वाट्याला आलेले पाहून तिथून जाणाऱ्या व्यक्तीलाही चिमुकल्याची विचारपूस केल्याशिवाय राहावलं नाही.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: एसी लोकलमध्ये तिकीट न काढलेल्या तरुणींना टीसीने असंच सोडलं; कारण वाचून सांगा टीसीने हे बरोबर केलं का?
चिमुकल्याची ही धडपड आणि कष्टाने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. लेक असावा तर असा, असे म्हणत अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी परिस्थिती सगळं काही शिकवते, असे म्हणत त्या चिमुकल्याच्या जिद्दीला दाद दिली आहे.