Viral video: माणसाला घडवण्यात, बिघडवण्यात, संकटावर मात करण्यास परिस्थिती शिकवते. म्हणूनच गरिबी वाईट नसते, खरतंर हीच गरीबी आपल्याला लढायला शिकवते, असे म्हणले जाते. सध्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. जो पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत. त्याची ही धडपड आणि काम करण्याची प्रचंड इच्छाशक्ती पाहू नेटकरी तोंडभरुन कौतुक करताना दिसत आहेत. चिमुकल्याची ही धडपड पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. बालमजुरी हा कायदेशीर गुन्हा असून एक सामाजिक शाप आहे जो मुलांना शाळेत जाण्याचा हक्क हिरावून घेतो आणि गरिबी वाढण्यास हातभार लावतो. अनेक बालकामगार प्रतिबंधक कायदे आणि जनजागृती करूनही बालमजुरी संपत नाही. अशाच एका चिमुकल्याचं जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली निरागस बालपण चिरडलेलं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही डोळ्यांत पाणी येईल.

आयुष्य हे फक्त आनंदी राहणे, हसणे किंवा मजा-मस्ती करण्यापुरते मर्यादित नसते. आयुष्यात कधी कधी थोडे दुःख संघर्ष आणि भरपूर कष्ट सहन करावे लागतात. कोणाची आर्थिक परिस्थिती चांगली असते तर कोणाची नसते. ही परिस्थिती प्रत्येक व्यक्तीला खूप काही शिकवते. जी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीला सामोरी जाते तीच व्यक्ती खऱ्या अर्थाने घडते. परिस्थिती व्यक्तीला जगायला शिकवते. सध्या अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. स्वत:च्या परिस्थितीवर नाराज असणाऱ्या प्रत्येकानं पाहावा असा हा व्हिडीओ आहे.

eknath shinde devendra fadnavis (1)
महायुतीची सत्ता आल्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार? शिवसेना नेत्यांची मोर्चेबांधणी; भाजपाचाही पाठिंबा?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Prakash Ambedkar on government formation
Vanchit Bahujan Aghadi : निकालाआधीच वंचितचा मोठा निर्णय, पाठिंब्याबाबतची भूमिका जाहीर!
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Sada Sarvankar
Sada Sarvankar : “मला निवडणूक लढवावीच लागेल”, सदा सरवणकर हतबल; म्हणाले, “राज ठाकरेंनी माझी…”
Donald Trump Won US Presidential Election 2024
Donald Trump Won US Election 2024: दुसऱ्या टर्मसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा अजेंडा ठरला; पहिल्याच भाषणात केला उल्लेख, म्हणाले…
Reddy was a second-year student at Kansas State University
बंदूक स्वच्छ करायला घेतली अन् छातीतच लागली गोळी; भारतीय विद्यार्थ्याचा अमेरिकेत वाढदिवशी मृत्यू!
Sharad Pawar NCP gives Tickets to Rohit Patil and Siddhi Kadam
Sharad Pawar NCP Young Candidate : शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीतल्या रिंगणात उतरलेले सर्वात तरुण उमेदवार कोण?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक चिमुकला रस्त्याच्या कडेला गाडीतून सामान डोक्यावर घेऊन जात आहेत.खेळण्याच्या वयात, आईकडे हट्ट करण्याच्या वयात हा चिमुकला घरच्यांना मदत करत आहे. आई वडिलांना मदत करताना खारीचा वाटा उचलत आहे. या वयात मुले शाळेत जाण्यासाठीही रडारड करतात, त्या वयात हा चिमुकला कष्ट करत आहे. या लहानग्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रत्येकाने हसत हसत आनंदाने आयुष्य जगलं पाहिजे. असं म्हणतात की, हसल्याने आपलं आयुष्य वाढतं. मोठ मोठ्या अपेक्षा न ठेवता समाधान शोधलं की आनंद आपोआप मिळतो हेच या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “डोळं रोखून असं काय बघता हो पावणं…” तरुणाच्या भन्नाट लावणीसमोर गौतमी पाटीलही फिकी पडेल

चिमुकल्याची ही धडपड आणि सुंदर कृतीने नेटकऱ्यांची मने जिंकली आहेत. लेक असावा तर असा असे म्हणत अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे. तर काही जणांनी जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली चिरडलेलं निरागस बालपण, असे म्हणत त्या चिमुकल्याच्या जिद्दीला दाद दिली आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर vip_thoughts99 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.  अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत “लेक असावा तर असा” असं म्हंटलंय. तर आणखी एकानं लिहिलंय, “माणसाची परिस्थिती त्याला असं करण्यास भाग पाडते.” आणखी एकानं लिहिलंय, “गरीब परिस्थिती माणसाला हतबल बनवते.”