Emotional Viral Video : गरिबी कोणालाही आवडत नाही. अगदी पत्र्याच्या घरात राहणारा माणूसही कधीतरी आपणही इमारतीत राहायला जाऊ, असे स्वप्न बघतो. त्यासाठी तो प्रयत्नदेखील करतो. मात्र, काही वेळा परिस्थिती, वेळ, वाईट सवयी व चुकां यांमुळे गरिबीची परिस्थिती ओढवते. या गरिबीवर मात करणे काहींना जमते; पण काही जण व्यसनाच्या आहारी जाऊन गरिबीचे जगणे निवडतात. सध्या अशाच एका गरिबाचा रोजच्या जगण्यातील संघर्षाचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय, जो पाहून तुमच्याही डोळ्यांतून पाणी आल्याशिवाय राहणार नाही. हा व्हिडीओ खरेच काळजाला भिडणारा आहे.

माणसाला जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या तीन गोष्टींची गरज असते. हल्ली अनेकांच्या या गरजा सोईनुसार बदलतात; पण आजही असे अनेक लोक आहेत, ज्यांना या तीन गरजा भागवणेही कठीण जाते. तुम्ही रस्त्याच्या कडेला गरिबांची अनेक घरे पाहिली असतील, ज्याला भिंती सोडा, पत्राही नसतो. अन्नासाठी रोज त्यांना वणवण भटकावे लागते. हाताला मिळेल ते काम करावे लागते. अंगावरील कपड्यांसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागते. रस्त्यावरून जाणारे लोक देतील ते कपडे हे लोक घालतात. सध्या नागपुरातील अशाच एका गरीब व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय,

या व्हिडीओत तो माणूस रस्त्याच्या कडेला फेकून दिलेल्या कपड्यांमधून जीन्स उचलून घातलाना दिसतोय. हे दृश्य पाहून गरिबीत जगताना किती संघर्ष करावा लागतो याची जाणीव होईल.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एका चौकात रस्त्याच्या कडेला फेकलेल्या कपड्यांचा मोठा ढीग पडला आहे. या ढिगाऱ्याजवळ एक गरीब माणूस हातात भंगाराची मोठी गोणी घेऊन येतो आणि तिथे थांबतो. रस्त्यावर फेकलेल्या कपड्यांच्या ढिगाऱ्यातून तो चांगले कपडे शोधू लागतो. या कपड्यामधून तो एक जीन्स उचलतो आणि ती घालून बघतो. पण, हे दृश्य पाहताना एखाद्या व्यक्तीला गरिबीमुळे किती हलाखीचे जीवन जगावे लागते, याची जाणीव होते. हा व्हिडीओ पाहून खरेच अनेकांनी अशी गरिबी कोणाच्याही वाटेला येऊ नये, अशी प्रार्थना केली आहे.

गरीबाचा रोजच्या जगण्यातील संघर्ष (Emotional Viral Video)

डोळ्यांतून पाणी आणणारा हा व्हिडीओ @humnagpurkar नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय की, नागपूरच्या इतवारीत हृदय पिळवटून टाकणारं दृश्य! एक माणूस कचऱ्यात सापडलेली पँट घालताना आणि तिथून कचरा उचलताना दिसला… ही गरिबी नाही, तर एक संघर्ष आहे! दरम्यान, या व्हिडीओवर युजर्सदेखील वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. एका युजरने लिहिले की, जीवनाच दुसरं नावच संघर्ष आहे. दुसऱ्या एकाने लिहिले की, ही परिस्थिती काही वेळा लोक स्वत:हून ओढवून घेतात. दारू पिऊन पैसे वाया घालवतात; मग असं होतं. पोरांना शिकवा मोठं करा, चुकीच्या संगती लावू नका.