विकेंडला ऑफिसची कामे करायला अनेकांना आवडत नाही. परंतु अनेकदा काही कर्मचाऱ्यांना इच्छा नसतानाही कामाचा प्रचंड ताण असल्यामुळे विकेंडला ऑफिसची कामे करावी लागतात. यावरुन अनेकदा कर्मचारी आणि त्यांच्या बॉसमध्ये वादही होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका कर्मचाऱ्याला विकेंडला काम करायला सांगताच तो त्याच्या सिनियरवर चांगलाच संतापल्याचं पाहायला मिळत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ऑफिसमधील कर्मचाऱ्यांची एक ऑनलाईन मिटींग सुरु असल्याची दिसत आहे. यावेळी अनेकांनी मिटींगला हजेरी लावल्याचंही दिसत आहे. या ऑनलाइन मिटींगदरम्यान दोन कर्मचाऱ्यांमध्ये वाद होतो. सिनियर त्याच्या ज्युनिअरला विकेंडला काम करायला सांगताच, ज्युनिअर संतापल्याचं पाहायला मिळत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये कर्मचाऱ्यांचा आवाज ऐकायला येत आहे. ज्यामध्ये सिनियर त्याच्या ज्युनिअरला म्हणतो, “रिपोर्टला उशिर होता कामा नये, अन्यथा शनिवार-रविवारी म्हणजेच विकेंडला तुला काम करावे लागेल.” यावर ज्युनिअर चांगलाच संतापतो आणि सिनियरला प्रश्न विचारायला सुरुवात करतो.
हेही पाहा- “फोन काप्पो…” हार्दिक पांड्याचा ‘तो’ VIDEO शेअर करत मुंबई पोलिसांचे नागरिकांना आवाहन, म्हणाले…
ज्युनिअर सिनियरला कर्मचाऱ्याला म्हणतो, “एक सेकंद, शनिवार आमि रविवारी काम करण्याचा मुद्दा कुठून आला? तुम्ही कधी शुक्रवारी थांबवून घेता तर कधी म्हणता, शनिवार-रविवारी काम करावे लागेल, असं थोडीचं चालते.” यावर सिनियर म्हणतो, रिपोर्ट द्यायचा असेल तर कोण देणार? यावर ज्युनिअर म्हणतो, “मी सोमवारी देईन असं सांगतोय.”
यावेळी सिनियर म्हणतो, “निखिल, नीट बोल. मी तुजा सिनियर आहे, माझी ऑर्डर तुला फॉलो करावी लागेल.” निखिल म्हणतो, “तुम्हाला तुमची ऑर्डरच चालवायची असेल तर जाऊन स्विगी चालवा, इथे नाही. या कामातून मी काही पैसे कमावतो याचा अर्थ असा नाही की, तुम्ही मला अंबानी बनवणार आहात. तुम्ही पण नीट बोला.” या दोघांमधील वादाचा काही भाग एका कर्मचाऱ्याने शूट केला होता. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया –
या व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकाने लिहिलं, “आजकालचं वर्क कल्चर खूप त्रासदायक बनलं आहे.” तर दुसर्याने लिहिले, “या ऑडिओमधील सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे, तुम्ही मला अंबानी बनवणार नाहीत.” आणखी एका युजरने लिहिलं, “अशा सिनियरवर कायदेशीर कारवाई करायला पाहिजे, जो ज्युनिअर्सच्या मानसिक आरोग्याची काळजी घेत नाही.”