नोकरी महत्त्वाची आहे की तुमचं आरोग्य, असा प्रश्न विचारला तर, साहजिकच तुमच्यापैकी अनेक जण आरोग्य महत्त्वाचं आहे, असं म्हणतील यात शंका नाही. परंतु, लोकांवरील कुटुंब चालवण्याच्या जबाबदाऱ्या जसजशा वाढतात, तसतसं त्यांना आरोग्यापेक्षा नोकरीला जास्त महत्त्व देणं भाग पडतं. कारण- त्यांच्यावर कामाचा भार इतका असतो की कधी कधी त्यांना आजारपणात विश्रांती घ्यायलाही वेळ मिळत नाही. त्यामुळे ते आजारपणातही काम करण्याला प्राधान्य देतात. परंतु, अनेकदा आजारी असल्याचं कारण सांगूनही बॉस सुट्टी देत नाही. त्यामुळे अनेकांना बॉसचा राग येतो; परंतु ते काहीही करू शकत नाहीत. कारण- प्रश्न नोकरी टिकवण्याचा असतो. पण, सध्या एका कर्मचाऱ्यानं बॉसनं आजारपणात रजा द्यायला नकार देताच थेट राजीनामा दिल्याची घटना समोर आली आहे; ज्याची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियावर एक कर्मचारी आणि त्याचा बॉस यांच्यातील व्हॉट्सअ‍ॅप चॅटिंगचा स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे; जो Reddit वर शेअर करण्यात आला आहे. या चॅटमध्ये कर्मचारी त्याच्या बॉसकडे आजारी असल्यामुळे रजा मिळावी, अशी विनंती करतो. परंतु, त्याचा बॉस सुट्टी देण्यासाठी डॉक्टरांच्या चिठ्ठीची मागणी करतो. बॉसचा आपल्यावर विश्वास नाही आणि तो सुट्टी द्यायला नकार देत असल्याचं समजताच हा कर्मचारी थेट आपण नोकरी सोडत असल्याचा मेसेज बॉसला पाठवतो.

Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Husband Sent Letter watch promo
Bigg Boss 18: “मी नीट झोपतंही नाहीये, जेवणाची चव गेलीये…”, शिल्पा शिरोडकरने ढसाढसा रडत वाचलं नवऱ्याचं पत्र, पाहा व्हिडीओ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Bigg Boss 18 Shilpa Shirodkar Evicted From Salman Khan Show
Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या चार दिवसाआधी झालं मिड वीक एविक्शन, ‘ही’ मराठमोळी सदस्य झाली घराबाहेर
Image Of Jwala Gutta And L&T Chairman
“कर्मचाऱ्यांनी पत्नीकडे का पाहू नये?”, ज्वाला गुट्टाचा संताप; ‘L&T’च्या अध्यक्षांविरोधात वाढली टीकेची धार
Bigg Boss 18 chahat pandey talks about boyfriend with kashish Kapoor watch video
Bigg Boss 18: चाहत पांडेने स्वतः बॉयफ्रेंड असल्याचा केलेला खुलासा, कशिश कपूरला दाखवलेली साखरपुड्याची अंगठी, ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल
Image Of Harsh Goenka.
L&T Chairman : “रविवारचे नाव ‘Sun-Duty’ करा”, रविवारीही काम करण्याचा सल्ला देणाऱ्या एल अँड टी च्या अध्यक्षांना अब्जाधीशाचा टोला
Bigg Boss Marathi Season 5 Dhananjay Powar answer to troller
“फर्निचरचं दुकान चालवण्यासाठी सर्वसामान्यांची फसवणूक…” म्हणणाऱ्यावर धनंजय पोवार भडकला, म्हणाला, “किती घाणेरडी वृत्ती…”
Bigg Boss 18 Shrutika Arjun has been Evicted from salman khan show in Mid week eviction
Bigg Boss 18: महाअंतिम सोहळ्याच्या १० दिवसांआधी झालं ‘मिड वीक एविक्शन’, कमी मतांमुळे ‘हा’ सदस्य घराबाहेर

हेही पाहा- VIDEO : याला म्हणतात मृत्यूच्या दाढेतून परत येणं; अंगावर दोनदा वीज पडली तरीही सुखरुप बचावला ‘हा’ व्यक्ती

व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा हा स्क्रीनशॉट Reddit वर पोस्ट करण्यात आला आहे. ज्यामध्ये सर्दी आणि ताप आल्यामुळे कर्मचारी बॉसकडे रजा मागतो, यावेळी बॉस कर्मचाऱ्याकडे आजारी असल्याचा पुरावा म्हणून डॉक्टरांची चिठ्ठी मागतो. त्यावर कर्मचारी “डॉक्टरांकडे जाण्यासाठी पुरेसे पैसे नाहीत,” असं म्हणतो. तर, बॉस डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कर्मचार्‍याला सुट्टी द्यायला नकार देतो आणि म्हणतो, “ताप हे ऑफिसला न येण्याचं कारण होऊ शकत नाही.” बॉसचा मेसेज पाहून कर्मचारी संतापतो आणि आपण थेट नोकरी सोडत असल्याचे सांगतो.

इथे पाहा पोस्ट-

हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी बॉसच्या वागण्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. एका युजरनं लिहिलं, “माझ्या हाताखाली काही लोक काम करतात. अनेक कर्मचारी असे वर्कहोलिक असतात की, आजारी असतानाही ते ऑफिसला येतात. मी त्यांना आजारपणात ऑफिसमध्ये येऊ नका, असे सांगतो. कारण- त्याच्यामुळे इतर लोकही आजारी पडण्याचा धोका असतो.” दुसर्‍यानं लिहिलं, “जर तुम्हाला ताप आला असेल, तर तुम्ही नक्कीच संसर्गजन्य आहात.” तर काही नेटकऱ्यांनी अनेक कर्मचारी आजारपणाचं नाटक करतात. त्यामुळे बॉसने डॉक्टरांची चिठ्ठी मागितली हे योग्य केल्याचं म्हटलं आहे. तर, अनेक जण थेट व्हॉट्सअ‍ॅपवर राजीनामा देणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कृतीचं कौतुक केलं आहे.

Story img Loader