नोकरी महत्त्वाची आहे की तुमचं आरोग्य, असा प्रश्न विचारला तर, साहजिकच तुमच्यापैकी अनेक जण आरोग्य महत्त्वाचं आहे, असं म्हणतील यात शंका नाही. परंतु, लोकांवरील कुटुंब चालवण्याच्या जबाबदाऱ्या जसजशा वाढतात, तसतसं त्यांना आरोग्यापेक्षा नोकरीला जास्त महत्त्व देणं भाग पडतं. कारण- त्यांच्यावर कामाचा भार इतका असतो की कधी कधी त्यांना आजारपणात विश्रांती घ्यायलाही वेळ मिळत नाही. त्यामुळे ते आजारपणातही काम करण्याला प्राधान्य देतात. परंतु, अनेकदा आजारी असल्याचं कारण सांगूनही बॉस सुट्टी देत नाही. त्यामुळे अनेकांना बॉसचा राग येतो; परंतु ते काहीही करू शकत नाहीत. कारण- प्रश्न नोकरी टिकवण्याचा असतो. पण, सध्या एका कर्मचाऱ्यानं बॉसनं आजारपणात रजा द्यायला नकार देताच थेट राजीनामा दिल्याची घटना समोर आली आहे; ज्याची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा