Viral video: बॉस हा शब्द उच्चारताच शिस्तप्रिय व्यक्तीचं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. बॉसच्या समोर बोलायचं तरी अनेकांना घाम फुटतो. कारण- शेवटी विषय नोकरीचा असतो. त्यामुळे बॉससोबत बोलणं अनेक जण टाळत असतात. बॉसच आपल्या कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या सूचना, टार्गेट, तर कधी कधी चॅलेंज देत असतो. मात्र, एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी चक्क आपल्याच बॉसला चॅलेंज देण्याची हिंमत दाखवली आहे. या सगळ्या कर्मचाऱ्यांनी चक्क ऑफिसच्या दरवाजावरच बॉससाठी चॅलेंजचा कागद लावला आणि बॉसला हे चॅलेंज पूर्ण करण्यास सांगितले. एवढंच नाही तर हे चॅलेंज पूर्ण केलं, तरच आम्ही काम करू, अशी अटही घातली आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, बॉसला कर्मचाऱ्यांनी असं कोणतं चॅलेंज दिलंय आणि बॉसनं ते पूर्ण केलंय का पाहूयात.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऑफिसच्या दरवाजावर एक कागद चिकटवलेला आहे आणि त्यावर बॉससाठी एक चॅलेंज देण्यात आलं आहे. सर्व जण बॉस येण्याची वाट पाहत आहेत. कारण- बॉस आल्यावर ते हे चॅलेंज स्वीकारतील का हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. दरम्यान, आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, नेमकं असं काय चॅलेंज दिलंय कर्मचाऱ्यांनी? तर कर्मचाऱ्यांनी काचेच्या प्रवेशद्वारावर बॉसला उद्देशून, “तुम्ही जर डान्स करीत ऑफिसमध्ये आलात, तरच आम्ही आज काम करू” असं लिहिलं आहे. आता हे चॅलेंज बॉस स्वीकारतील का, अशी शंका असतानाच बॉसची एन्ट्री होते आणि सगळेच शॉक होतात. कारण- हा कागद वाचल्यानंतर क्षणाचाही विचार न करता, हा बॉस नाचत नाचत ऑफिसमध्ये प्रवेश करतो. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बॉस अगदी मस्त डान्स मूव्ह करीत ऑफिसमध्ये प्रवेश करताना दिसत आहे. आपल्याला एक विचित्र चॅलेंज दिल्याबद्दल कर्मचाऱ्यांवर कुरघोडी करण्याऐवजी बॉसनं अगदी सहज हे चॅलेंज स्वीकारल्यामुळे सर्वच जण खूश झाले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> आयुष्यात एका सेंकदाची किंमत काय? कोसळणाऱ्या इमारतीचा व्हिडीओ काढताना दगड उडून आला अन्… VIDEO पाहून थरकाप उडेल

व्हिडिओला १० दशलक्ष व्ह्यूज मिळाले

ऑरलँडो, बुरानो हंटर्स क्रीक येथील रिअल इस्टेट कंपनीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १० दशलक्ष व्ह्युज मिळाले आहेत. तर, नेटकरीही या बॉसचं कौतुक करीत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलंय, “प्रत्येकाला अशा बॉसची गरज आहे.” तर आणखी एकानं, बॉस असावा तर असा, अशी प्रतिक्रिया दिली आहे.