कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणे दिवसेंदिवस आव्हानात्मक होत आहे. कारण- प्रत्येक कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांकडून चांगल्यातले चांगले काम व्हावे, असे वाटत असते. अशा वेळी कंपनीसाठी जीव तोडून मेहनत केल्यानंतर एक वेळ अशी येते की, वाटते- महिनाभर सुट्टी घेऊन आराम करावा. पण, असे करणे अनेकदा शक्य होत नाही. कारण- कंपनीत प्रत्येक कर्मचाऱ्यावर कामाची एक जबाबदारी असते; जी वेळेत पूर्ण व्हावी, अशी कंपनीची अपेक्षा असते. त्यात जर दुसरा कर्मचारी रजेवर असेल, तर त्याचेही काम तुम्हाला करावे लागते. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना पाहिजे तेवढ्या सुट्या कधी मिळतच नाहीत. अशा परिस्थितीत रोज तेच तेच काम करून खूप वैताग येतो. पण, कर्मचाऱ्यांची ही परिस्थिती कोणाला कळतच नाही.
अशा परिस्थितीचा सामना करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आता सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून त्यांच्या चेहऱ्यावर काही सेकंद का होईना हसू येईल आणि मलाही असं ऑफिस हवं असं वाटू लागेल.
सध्या एका ऑफिसमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे; ज्यात काही कर्मचारी आपल्या डेस्कजवळ उभे राहून चक्क आनंदानं नाचताना दिसत आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हे कर्मचारी ऑफिसमध्ये असे अचानक का नाचतायत? तर त्यामागचे उत्तर म्हणजे कर्मचाऱ्यांचा ताण कमी करण्यासाठी ही डान्स थेरपी वापरली जात आहे.
डान्समुळे आपले शरीर फिट राहते; शिवाय ताण कमी होतो; ज्यामुळे अनेक ऑफिसेसमध्ये कर्मचाऱ्यांसाठी हल्ली डान्स थेरपी वापरली जात आहे. सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका ऑफिसमध्ये सर्व कर्मचारी भांगडा करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासमोर एक ट्रेनर आहे, जो त्यांना भांगड्याच्या स्टेप्स शिकवत आहे. या डान्स ॲक्टिव्हिटीमुळे कर्मचाऱ्यांची कामातील एकाग्रता वाढते. त्यामुळेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जात आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक युजर्स आता मलाही अशा ऑफिसमध्ये काम करण्याची संधी हवीय, असे म्हणतायत.
पाहा व्हायरल व्हिडीओ-
हा व्हिडीओ (sahil_sharma0007) नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, बस्स फक्त असं ऑफिस मिळायला हवं. तीन दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या या व्हिडीओला आततापर्यंत एक लाखाहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. तर युजर्स त्यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिलेय की, हा नक्कीच एचआर विभाग असेल. तर दुसऱ्या युजरने लिहिलेय की, मलाही असं ऑफिस हवं आहे.