अनेक कर्मचाऱ्यांना रोज ऑफिसला पोहायला उशीर होतो. अनेकदा रस्त्यावरील ट्राफिक, विलंबाने धावणाऱ्या ट्रेन्स यामुळे उशीर होतो. पण ऑफिसमध्ये रोज ट्रॅफिक किंवा ट्रेनचे कारण देणे योग्य वाटत नसल्याने कर्मचारी मुकाट्याने लेटमार्क आणि काही वेळा बॉसचा ओरडा सहन करतात. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये तर ऑफिसच्या वेळांमध्ये ट्रॅफिकची समस्या गंभीर बनत आहे. यात भारताचे आयटी हब बेंगळुरुदेखील मागे नाही. बंगळुरुमध्ये ट्रॅफिकमुळे नागरिक हैराण झाले आहे. या शहरात मोठे आयटी हब आणि अनेक कंपन्याची ऑफिसेस असल्यामुळे रोज ट्रॅफिकचा सामना करावा लागतो. यात शहरातील रस्त्यांवरून प्रवास करताना कर्मचाऱ्यांना आपला मौल्यवान वेळ ट्रॅफिकमध्ये घालवावा लागतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या ट्रॅफिकमुळे बंगळुरुमध्ये अनेक कर्मचाऱ्यांना रोज ऑफिसला पोहचण्यास उशीर होत आहे. यामुळे काही वेळा कर्मचाऱ्यांवर भररस्त्यात धावत्या गाडीवर बसून काम करण्याची वेळ येत आहे. अशाच एका प्रसंगाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ट्रॅफिकमध्ये फसलेली तरुणी चालत्या स्कूटीवर बसून लॅपटॉपवर काम करीत आहे.

व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये तुम्ही एक तरुणी पाहू शकता, जी IT क्षेत्रात काम करीत असल्याचा अंदाज आहे. जी बेंगळुरूच्या गजबजलेल्या रस्त्यावरून रॅपिडो बाइकवरून ऑफिसला जात असताना लॅपटॉपवर काम करीत आहे. या तरुणीने ट्रॅफिक जॅममुळे ऑफिसला वेळेवर पोहचू न शकल्याने तिने चालत्या स्कूटीवर बसून लॅपटॉप ऑन करून कामाला सुरुवात केल्याचे दिसतेय.

ट्रॉफिकमध्ये अडकल्याने तरुणीने रस्त्यावरच ऑन केला लॅपटॉप

ट्विटरवर व्हायरल होणारा हा फोटो सध्या खूप चर्चेचा विषय ठरत आहे. फोटो शेअर करताना एका ट्विटर युजरने लिहिले, “रॅपिडो बाइकवरून ऑफिसला जाताना काम करणारी महिला.” त्याचप्रमाणे एक महिला चालत्या ऑटोमध्ये बसून लॅपटॉपवर काम करीत असतानाचा आणखी एक फोटोही व्हायरल होत आहे. या फोटोंमुळे पुन्हा एकदा ‘वर्क फ्रॉम होम’ मुद्दा चर्चेत आला आहे.

अबब! चिमुकल्याने भल्यामोठ्या अजगराच्या आधी तोंडाला पडकले आणि मग…; पाहा धडकी भरवणारा Video

यावर एका युजरने लिहिले की, ‘म्हणूनच WFH ची खूप गरज आहे पण तुमच्या कंपनीला तुम्ही अडचणीत यावे असे वाटतेय.’ दुसर्‍या एका युजरने लिहिले की, ‘वर्क फ्रॉम होम’ करताना सर्व काही ठीक होते, परंतु कंपन्यांच्या आदेशांचे पालन करणे आणि कर्मचाऱ्यांना गुलाम म्हणून ठेवणे आवश्यक आहे. या फोटोवर एक दोन नाही तर शेकडो कमेंट्स येत आहेत. काही युजर्संनी कमेंट्समधून आपल्या व्यथा मांडण्यास सुरुवात केली आहे, तर काही युजर्स त्यावर हसून आपल्या भावना व्यक्त करीत आहेत.