नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक खुशखबर आहे. देशांमधले बेरोजगारीचे प्रमाण आता लवकरच कमी होणार असून पुढील सहा महिन्यांत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. ‘टीमलीज’ने नुकताच एक अहवाल प्रसिद्ध केला असून देशात रोजगाराच्या अनेक संधी वर्षभरात उपलब्ध होणार असल्याचे म्हटले आहे.

देशामधल्या सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण वाढले आहे. देशात अनेक क्षेत्रात उच्च शिक्षित असूनही रोजगारांच्या संधी मात्र उपलब्ध नाहीत. त्यामुळे सुशिक्षितांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. पण टीमलीजने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात ऑक्टोबर २०१६ पासून ते मार्च २०१७ पर्यंत अनेक क्षेत्रात रोजगारांच्या नव्या संधी उपलब्ध होणार असल्याचे म्हटले आहे. पण त्याचबरोबर टीमलीज कंपनीचे अध्यक्ष कुणाल सेन यांनी मात्र आयटी, ई-कॉर्मस, रिटेल अँड मॅन्यूफॅक्चर तसेच इंजिनिअरिंच्या क्षेत्रात मात्र रोजगाराच्या फारशा संधी उपलब्ध होणार नसल्याचे म्हटले आहे. टेलिकॉम किंवा आर्थिक क्षेत्रात मात्र येत्या काही वर्षांत रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतील अशी शक्यताही या अहवालातून वर्तवण्यात आली आहे.

Story img Loader