आजकाल लहानांपासून वयस्कर लोकांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारची समस्या सामान्यतः वयस्कर लोकांमध्ये आढळून यायची, परंतु आता प्रत्येक वयोगटातील व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडत आहे. अनेकांना कधी जिममध्ये व्यायाम करताना तर कधी डान्स करताना हृदयविकाराचा झटका आल्याच्या घटना आपण सोशल मीडियावर पाहत असतो. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लग्न समारंभात नाचताना एका इंजिनीअरचा हृदयविकाराच्या झटक्याने जागीच मृत्यू झाला आहे.

मृत इंजिनीअरचे नाव दिलीप राऊतकर असे आहे. ते आपल्या भाचीच्या लग्नात डान्स करत असताना मृत्यू झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये दिलीप राऊतकर हे लग्न समारंभात स्टेजवर वधू-वर आणि त्यांच्या कुटुंबीयांसह नाचताना दिसत आहेत. नाचत असताना दिलीप स्टेजवर बसतात आणि काही क्षणात खाली कासळतात.

transformer Failure Mahapareshan,
महापारेषणच्या ५० एमव्हीए रोहित्रात बिघाड, वसई विरारमधील वीज पुरवठ्यावर परिणाम
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Phoenix Mall , Pimpri-Chinchwad, Accused opened fire,
पिंपरी-चिंचवड: फिनिक्स मॉलच्या समोर गोळीबार करणाऱ्या आरोपीला अटक; ‘या’ कारणांमुळे केला गोळीबार
three die after bike collides with bus in raigad incident caught on dashcam
Video : रायगडमध्ये बसला दुचाकीची धडक, तिघांचा मृत्यू; घटना कॅमेऱ्यात कैद
Manu Bhaker Special Message to Neeraj Chopra on His Injury in Diamond League
Manu Bhaker Neeraj Chopra: मनू भाकेरचा नीरज चोप्रासाठी खास संदेश, दुखापतीच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना म्हणाली…
deaf boy drowned in river embankment
मूकबधिर मुलगा नदीच्या बंधाऱ्यात बुडाला
peoples lives will be saved due to the remote operated device
खरंच आता कुणी पाण्यात बुडणार नाही? रिमोटवर चालणाऱ्या यंत्रामुळे वाचणार लोकांचा जीव, VIDEO होतोय व्हायरल
Back Pain, Back Pain Fear, Back Pain Awareness,
Health Special : कंबरदुखी: भीतीतून जागरूकतेकडे (भाग १)

हेही पाहा- “लग्नासाठी सरकारी नवरा…” बेरोजगार तरुणाने मुलींच्या पालकांना पोस्टरद्वारे केलं अनोखं आवाहन, स्टेडियमधील ‘तो’ Video व्हायरल

हेही पाहा- गच्च भरलेल्या मेट्रोत कपलचा अश्लील Video व्हायरल; तरुणीची अवस्था पाहून नेटकरी थक्क

दरम्यान, स्टेजवर काय झाले हे लोकांना समजण्यापूर्वीच दिलीप यांचा मृत्यू होतो. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ मे रोजी रात्री १२ च्या सुमारास दिलीप आणि त्याचे नातेवाईक स्टेजवर वधू-वरासोबत नाचत होते. नाचत असताना दिलीप यांच्या छातीत अचानक दुखू लागले यावेळी ते स्टेजवर पडले आणि त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, व्हिडीओमध्ये दिलीप हे गाण्याच्या तालावर जोरदार डान्स करताना दिसत आहेत. मात्र, मध्येच त्यांच्या छातीत दुखायला लागल्यामुळे ते खाली बसत असल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. शिवाय काही वेळाने ते खाली पडल्याचं दिसताच उपस्थित लोक तिथे वाजणारे गाणे बंद करतात आणि त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतात, पण तोपर्यंत दिलीप यांचा मृत्यू होतो. हा सर्व प्रकार व्हिडिओमध्ये शूट झाला असून या घटनेचा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.