Man Leaves Noida Flat, Moves To Go : भाड्याने राहणाऱ्यांनाच माहिती आहे की भाड्याने राहणे किती मोठी डोकेदुखी आहे. विशेषतः नोएडासारख्या ठिकाणी जिथे भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये राहणारे लोक अनेकदा त्रासलेले दिसतात. जास्त भाडे असूनही, त्यांना ज्या सुविधा हव्या आहेत त्या मिळत नाहीत. असेच काहीसे एका व्यक्तीबरोबर घडले, ज्याला महिन्याला ६४ हजार भाडे देऊनही त्याच्या पसंतीचे घर मिळाले नाही.

भाड्याला वैतागून नौएडमधून थेट गोव्याला गेला राहायला

शेवटी तो गोव्यात शिफ्ट झाला. नोएडाहून गोव्यात शिफ्ट झाल्यानंतर तो खूप आनंदी आहे. किनारपट्टीच्या राज्यात तो महिन्याला १९,००० रुपये भाडे देतो आणि त्याला घर आवडते. गेल्या वर्षी, मायक्रोब्लॉगिंग साइट X वर राज नावाच्या एका वापरकर्त्याने त्याच्या नोएडामधील अपार्टमेंटचा फोटो शेअर केला होता, ज्यासाठी तो दरमहा ६४,००० रुपये भाडे देत होता.

त्या फोटोमध्ये अपार्टमेंटमधील एक स्वप्नवत दृश्य दाखवण्यात आले होते. कॅप्शनमध्ये त्याने उपहासात्मकपणे लिहिले, “नोएडातील बाल्कनीतून काम करण्यासाठी आणि या स्वप्नवत दृश्याचा आनंद घेण्यासाठी ६४ हजार रुपये भरावे लागत आहेत”. आता, ताज्या अपडेटमध्ये, राजने खुलासा केला की तो नोएडातून गोव्यात राहायला ाला आहे आणि आता त्याच्या अपार्टमेंटचे दरमहा भाडे फक्त १९,००० रुपये देतो.

त्याने त्याच्या गोव्यातील अपार्टमेंटमधील दृश्य दाखवणारा एक फोटो देखील शेअर केला, ज्यामध्ये निसर्गाच्या सानिध्यात एक मोठी बाल्कनी आहे. त्याने पोस्टला कॅप्शन दिले, “अपडेट: गोव्यात स्थलांतरित झालो. दरमहा १९ हजार भाडे हे योग्य आहे.”

कमेंट सेक्शनमध्ये, राजने असेही उघड केले की, तो फक्त दोन आठवड्यांपूर्वीच समुद्रकिनाऱ्यावरील राज्यात गेला होता आणि त्याचा अनुभव आतापर्यंत चांगला आहे. स्थानिकांकडून त्याला कोणत्याही विरोधाचा सामना करावा लागला का असे विचारले असता, तो म्हणाला की त्याला आतापर्यंत कोणत्याही विरोधाचा सामना करावा लागला नाही.

या पोस्टवर वापरकर्त्यांची प्रतिक्रिया कशी होती?

राजने कमेंट केली, “मी नुकतेच २ आठवड्यांपूर्वी येथे आलो आहे आणि गेल्या आठवड्यात मला एक अपार्टमेंट मिळाले आहे – म्हणून मी कमेंट करू शकत नाही. पण आता मला एका प्रकारच्या विरोधाचा सामना करावा लागला नाही.”

दुसऱ्या वापरकर्त्याने विचारले, “वायफाय आणि विजेची सोय कशी आहे, भाऊ? स्थानिक लोकांबरोबर सर्व काही चांगले आहे का?” यावर राज म्हणाला, “हो, सुदैवाने त्यांच्याकडे इन्व्हर्टर आहे आणि मालकाने आधीच चांगले वायफाय बसवले आहे.”

दरम्यान, इतर वापरकर्त्यांनी कमेंट विभागात वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर केल्या. एका वापरकर्त्याने म्हटले, “गोव्यात आपले स्वागत आहे, मी डिसेंबर २०२३ मध्ये नोएडाहून येथे आलो, जरी नोएडामध्ये माझे स्वतःचे अपार्टमेंट होते. मी दक्षिण गोव्यात २ बीएचके पूर्ण सुसज्ज अपार्टमेंटसाठी १५ हजार देत आहे!” दुसऱ्या वापरकर्त्याने कमेंट केली “हे छान दिसते. तुमचा वेळ खूप छान जाईल.”