House Out Of Bottles : काही इंजिनीयर त्यांच्या कामात इतके हुशार आणि तज्ज्ञ असतात की, ते आपण विचारही करू शकत नाही, अशा गोष्टी उभ्या करून दाखवतात. सिव्हिल इंजिनियरिंगची अशी उदाहरणं अनेकदा पाहायला मिळतात; ज्यात ते काही वेळा असं घरं उभं करतात की पाहणाराही अवाक् होतो. अशाच प्रकारे एका सिव्हिल इंजिनीयरने काचेच्या बाटल्यांपासून चक्क एक घरं उभं केलं आहे; जे पाहून तुम्हीही आश्चर्यचकित व्यक्त कराल.
काचेच्या बाटलीचा वापर दिवा पेटवण्यासाठी किंवा काही शोपीस बनवण्यासाठी केल्याचं आपण पाहिलं आहे. पण, एका इंजिनीयरनं सहज तोडता येण्याजोग्या काचेपासून संपूर्ण घर बांधलं आहे. इंजिनीयरची कारागिरी पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
या अनोख्या काचेच्या घराचा एक व्हिडीओ सध्या एक्स (पूर्वीचे ट्विटर) शेअर करण्यात आला आहे. वर्ल्ड ऑफ इंजिनियर्स नावाच्या सोशल मीडिया हॅण्डलने हा व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यामध्ये काही लोक घर बांधण्यात व्यग्र दिसत आहेत. ते काचेच्या बाटल्या आणि रिकाम्या डब्यांच्या वापर करून घर बनवीत आहेत. बाटल्या अगदी तशाच रचल्या जात आहेत, जशा घर बांधण्यासाठी विटा रचल्या जातात. त्यात सर्वप्रथम सिमेंटचा थर, नंतर बाटल्या. अशा प्रकारे लांब, उंच व जाड भिंती बांधण्यात आल्या आहेत. फरशीसाठीही काचेच्या बाटल्यांचा वापर केला आहे. अशा प्रकारे एक-दोन खोल्या तयार करण्यात केल्या आहेत.
काचेच्या बाटल्यांपासून बनवले हटके घर
हे हटके घर पाहून लोक इंजिनीयरचं कौतुक करीत आहेत. एका युजरनं लिहिलं की, ही कल्पना आश्चर्यकारक आहे. दुसऱ्या युजरनं, ह्यानं काचेपासून घरं बांधल्याचे दिसतं. मात्र, काचेच्या बाटल्यांमध्ये त्याने वाळू किंवा खडेही भरायला हवे होते, असा सल्लाही दिला आहे. काही युजर्सनी यावर मजेशीर कमेंट्सही केल्या आहेत. एका युजरनं लिहिलं की, मला हे घर आवडलं; पण मी एकाच वेळी इतक्या बाटल्या पिऊ शकत नाही. आणखी एका युजरनं लिहिलं की, याला बार म्हणावं.