Viral Video: भारतातील अनेक प्रसिद्ध ठिकाण पाहण्यासाठी वर्षभर अनेक परदेशी पर्यटक येत असतात. भारतातील खाद्यपदार्थ, येथील पर्यटन पर्यटन स्थळांना भेट देतात आणि इन्स्टाग्राम व्हिडीओद्वारे त्यांचे अनुभव शेअर करतात. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अलीकडेच एक ब्रिटीश ब्लॉगर लडाखला आला आहे. तसेच तो लडाखमध्ये ट्रक दरम्यान प्रवास करताना दिसला आहे आणि या प्रवासादरम्यान त्याने काही दृश्य शूट करून व्हिडीओत दाखवली आहेत.

इन्स्टाग्राम युजर @mikeokennedyy हा इंग्लंडचा आहे आणि एक ट्रॅव्हल ब्लॉगर आहे. अलीकडेच तो भारतात आला आणि त्यांनी अनेक ठिकाणांना भेटी दिल्या. त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो लडाखमध्ये आहे. या व्हिडीओमध्ये त्याने लडाखमधील रस्ते किती धोकादायक आहेत हे दाखवले आहे. कारण वाटेत त्याला एक ट्रक उलटलेला दिसला. पण, त्याआधी त्याने एका भारतीय ट्रक चालकाकडे लिफ्ट मागितली. ट्रक चालकाने ब्लॉगरला हिंदीमध्ये बोलता येतं का असं विचारलं? त्यावर ‘मी थोडेसे हिंदी बोलू शकतो’ ; असे ब्लॉगर उत्तर देतो. ब्लॉगरने नक्की काय शूट केलं व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

हेही वाचा…‘नियम म्हणजे नियम…!’ सिग्नल पाहून थांबली ‘गाय’, वाहतूक नियमाचे पालन; VIDEO शेअर करीत पुणे पोलिसांकडून कौतुक

व्हिडीओ नक्की बघा…

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, ट्रक चालक ब्लॉगरला विचारतो की, ‘तू कुठून आला आहेस?’ ज्यावर ब्लॉगर म्हणतो की, ‘तो इंग्लंडचा आहे’. यावर ट्रक चालक म्हणतो की, ‘त्यालाही एकदा इंग्लंडला जायचे आ’हे. हे ब्लॉगर हसायला लागतो. त्यानंतर काही वेळाने विश्रांती घेतल्यावर ब्लॉगर ट्रकमधून उतरतो. व्हिडीओत एक ट्रक रस्त्याकडेला उलटलेला दिसत आहे.लडाखमधील रस्ते किती धोकादायक आहेत हे दाखवत लडाखची सहल किती धोकादायक असू शकते हे प्रत्येकाला हे दृश्य पाहून समजावण्यास सुरुवात करतो.

सोशल मीडियावर हा व्हायरल व्हिडीओ ब्लॉगरच्या @mikeokennedyy या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी त्यांना आवडलेल्या व्हिडीओतील गोष्टी कमेंटमध्ये नमूद करताना दिसत आहेत. तसेच एका युजरने लिहिले की, ‘प्रथमच एका परदेशी ब्लॉगरला भारतीय स्थळांचा उच्चार बरोबर करताना पाहिलं आहे’ ; अशी कमेंट केली आहे. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि भारतीय नागरिकांकडून व्हिडीओला पसंती मिळताना दिसत आहे.