रस्त्यावरून प्रवास करताना अनेकदा ऑटोरिक्षा, ट्रक, टॅक्सी किंवा बाईकच्या मागे असे काही भन्नाट कोट्स लिहिलेले असतात की, जे वाचून अनेकदा हसायला येते. पण, काही कोट्स असे असतात; जे फार भावनिक किंवा विचार करायला भाग पाडणारे असतात. त्यामुळे वाहनांवरील हे कोट्स अनेकदा लोकांचे लक्ष वेधून घेतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; ज्यात रिक्षावाल्याने आपल्या रिक्षाच्या मागे असे काही लिहिले आहे; जे पाहून तुमच्याही तोंडून आपसूक येईल, भावा तू बरोबर बोललास! सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काळ्या-पिवळ्या रंगाची एक रिक्षा रस्त्यावरून वेगाने जात आहे. यावेळी रिक्षाच्या मागून जाणाऱ्या एका व्यक्तीने त्या रिक्षाच्या मागे लिहिलेला एक सुंदर मेसेज व्हिडीओत कॅप्चर केला आहे; जो वाचल्यानंतर लोक केवळ प्रभावितच होत नाहीत, तर त्यापासून प्रेरणादेखील घेत आहेत. तुम्हाला आता उत्सुकता लागून राहिली असेल की, रिक्षाचालकानं असं नेमकं लिहिलंय तरी काय?
VIDEO: बटरफ्लाय, बटरफ्लाय! स्टंटबाज तरुणांसाठी पोलिसांचे अनोखे ट्वीट; म्हणाले, “उडणं कठीण; पण..”
रिक्षाच्या मागील बाजूच्या छोट्याशा खिडकीवरती ‘प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. कारण- मृत्यू अनपेक्षित आहे’, असा सुंदर मेसेज दिला आहे. म्हणजेच जीवनातील प्रत्येक क्षण मोकळेपणाने जगा. कारण- मृत्यू अनिश्चित आहे; जो कधीही होऊ शकतो, असे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्या रिक्षाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक जण या व्हिडीओच्या कमेंट्स बॉक्समध्ये सकारात्मक कमेंट्स करताना दिसत आहेत. अनेकांनी, भावा तू बरोबर लिहिलं आहेस, असं म्हटलंय. तर काहींनी, घरच्या जबाबदाऱ्यांसह जीवन आनंदात कसं जगायचं, असा प्रश्न केला आहे.