Entertainment Top 6 Films on Google Trends: ऑगस्ट २०२४ मध्ये बरेच चित्रपट प्रदर्शित झाले, आता महिना संपताना गुगल ट्रेंड्सने या महिन्यातील सर्वाधिक चर्चा असलेल्या चित्रपटांची नावं जाहीर केली आहेत. हे चित्रपट ट्रेंडिंग आहेत. यामध्ये स्त्री २, थंगलान, वेदा, खेल खेल में, लैला मजून, व रायन या चित्रपटांचा समावेश आहे. हे सर्व चित्रपट एकमेकांपेक्षा खूप वेगळे आहेत. हे चित्रपट कॉमेडी, हॉरर, रोमँटिक, ऐतिहासिक, अॅक्शन आणि एंटरटेनमेंट अशा वेगवेगळ्या जॉनरचे आहेत. बॉक्स ऑफिस आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक चर्चेत असलेल्या या टॉप सहा ट्रेंडिंग चित्रपटांबद्दल जाणून घेऊयात.

Google Trends
गुगलवर सर्च झालेल्या चित्रपटांची यादी (फोटो – गुगलवरून साभार)

ऑगस्ट 2024 मध्ये गुगलवर सर्वाधिक सर्च झालेल्या टॉप सहा चित्रपटांची यादी

१. स्त्री २

स्त्री २: सरकटे का आतंक हा अमर कौशिक दिग्दर्शित विनोदी भयपट आहे. चित्रपटाची निर्मिती मॅडोक फिल्म्स व झी स्टुडिओने केली आहे. हा मॅडॉक युनिव्हर्सचा पाचवा व २०१८ मधील ‘स्त्री’चा सीक्वेल आहे. यामध्ये श्रद्धा कपूर, राजकुमार राव, पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी व अपारशक्ती खुराना यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने ६०० कोटींहून जास्त कमाई केली आहे. हा २०२४ मधील सर्वाधिक कमाई करणारा बॉलीवूड चित्रपट, यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट, तर आजपर्यंत सर्वाधिक कमाई करणारा १० वा भारतीय चित्रपट ठरला आहे.

Google Trends stree 2
स्त्री २ (फोटो – गुगलवरून साभार)

सप्टेंबर महिन्यात OTT वर येणार ‘हे’ चित्रपट अन् सीरिज; वाचा संपूर्ण यादी

    स्त्री २ ची कथा: जिथे स्त्री चित्रपट संपतो, तिथूनच स्त्री दोनची सुरुवात होते. पहिल्या भागात स्त्री पुरुषांचे अपहरण करायची. दुसऱ्या भागात सरकटा महिलांचे अपहरण करतो. चित्रपट त्याच चंदेरी गावात घडतो. ज्याठिकाणी आधी ‘ओ स्त्री कल आना’ लिहिलं होतं, तिथे आता ‘ओ स्त्री रक्षा करना’ लिहिलेलं दिसतं. गावात सगळं काही सुरळीत असतं, अचानक एकेदिवशी बिट्टूच्या (अपारशक्ती खुराना) गर्लफ्रेंडला सरकटा उचलून नेतो. बिक्की म्हणजेच राजकुमार राव अजुनही त्या रहस्यमयी मुलीची (श्रद्धा कपूर) वाट पाहत असतो. एकेदिवशी रुद्रला चंदेरी पुराणची फाटलेली पानं सापडतात. त्यात जनाच्या (अभिषेक बॅनर्जी) मदतीने सरकटाबद्दल माहिती मिळू शकते, असा निष्कर्ष निघतो. याच दरम्यान श्रद्धा अचानक परत येते. पण सरकटा रुद्रची गर्लफ्रेंडचे (तमन्ना भाटिया) अपहरण केल्यावर गावातील पुरुषांच्या मदतीने महिलांच्या स्वातंत्र्यावर बंधनं आणतो. मग रुद्र, श्रद्धा, बिक्की आणि जना सरकटाला मारण्यासाठी एकत्र येतात.

    सेटवरचं प्रेम, वयात १४ वर्षांचे अंतर अन् कडाक्याची भांडणं; अभिनेता म्हणाला, “एका क्षणी मला वाटलं…”

    २. थंगलान

    थंगलान हा २०२४ मधील तमिळ चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन पा रणजीतने केले आहे. या चित्रपटात विक्रमच्या मुख्य व अनेक भूमिका आहेत. यात पार्वती थिरोवोथू, मालविका मोहनन, डॅनियल, पसुपती, हरी क्रिष्णन, अर्जुन अनबुदन, प्रिती करण हे कलाकार आहेत. विक्रमचा हा ६१ वा चित्रपट आहे. चित्रपटाचे शूटिंग चेन्नई, आंध्र प्रदेश, मदुराई, कर्नाटकमधील काही ठिकाणी झाले. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ ला प्रदर्शित झाला. या चित्रपटाने जगभरात ६७ कोटींची कमाई केली आहे.

    thangalaan
    थंगलान (फोटो – गुगलवरून साभार)

      थंगलानची कथा: थंगलान हा सत्य घटनांवर आधारित चित्रपट आहे. थंगालन म्हणजे Son of Gold. चित्रपटात ब्रिटिशांचा काळ दाखवण्यात आला आहे. ज्यामध्ये काही आदिवासी जमाती आपल्या देशातील सोन्याच्या खाणी ब्रिटिशांपासून वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. इंग्रजांना ज्या सोन्याच्या खाणीतून सोने काढायचे आहे ती मायावी आहे आणि देवी आरती तिचे संरक्षण करते. ब्रिटिशांचे अत्याचार, आदिवासी जमातींचे सोन्याच्या खाणी वाचवण्यासाठी प्रयत्न या गोष्टी सिनेमात दाखवण्यात आल्या आहेत.

      Arbaz Patel Girlfriend: अरबाज पटेलच्या गर्लफ्रेंडला पाहिलंत का? ती कोण आहे, काय करते? जाणून घ्या

      ३. वेदा

      वेदा हा २०२४ मधील बॉलीवूड चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन निखिल अडवाणीने केले आहे. या चित्रपटात जॉन अब्राहम, शर्वरी, अभिषेक बॅनर्जी व आशिष विद्यार्थी यांच्या भूमिका आहेत. खऱ्या घटनांपासून प्रेरित हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ ला प्रदर्शित झाला. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. चित्रपटाने जगभरात फक्त २३ कोटींची कमाई केली.

      vedaa
      वेदा (फोटो – गुगलवरून साभार)

        वेदा चित्रपटाची कथा: वेदा नावाची दलित मुलगी काश्मीरमध्ये एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्याचे आदेश धुडकावून लावल्याबद्दल कोर्ट-मार्शल झालेला मेजर अभिमन्यू कंवर याला फॉलो करत असते. वेदाला उच्चवर्णीयांकडून खूप त्रास दिला जात असतो. एका ट्विस्टनंतर कंवर त्याच शहरात असिस्टंट बॉक्सिंग कोच बनतो जिथे त्याच्या पत्नीला एका दहशतवाद्याने मारलं होतं. यादरम्यान वेदाबरोबर अनेक घटना घडतात. उच्चवर्गीय मुलीच्या प्रेमात पडल्याने तिच्या भावाचा खून होतो. पळून जाणाऱ्या तिच्या बहिणीला जिवंत जाळलं जातं. यानंतर वेदा संरक्षणासाठी अभिमन्यू कंवरकडे पोहोचते. यानंतर दोघांचा न्याय मिळवण्यासाठी प्रवास सुरू होतो, अशी चित्रपटाची कथा आहे.

        धाडस असेल तरच पाहा मन हेलावणारे OTT वरील ‘हे’ तीन चित्रपट, एकावर घालण्यात आली होती बंदी!

        ४. खेल खेल में

        खेल खेल में हा बॉलीवूड चित्रपट आहे, जो २०१६ मधील इटालियन चित्रपट परफेक्ट स्ट्रेंजर्स द्वारे प्रेरित आहे. याचे दिग्दर्शन मुदस्सर अझीझने केले आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, फरदीन खान, वाणी कपूर, तापसी पन्नू, अम्मी विर्क, आदित्य सील आणि प्रज्ञा जैस्वाल यांच्या भूमिका आहेत. हा चित्रपट १५ ऑगस्ट २०२४ रोजी रिलीज झाला. याचे बजेट १०० कोटी असून त्याने फक्त ३८ कोटी कमावले. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

        khel khel main
        खेल खेल में (फोटो – गुगलवरून साभार)

          खेल खेल में ची कथा: एका लग्नात तीन एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळी अशी विवाहित जोडपी रिषभ मलिकच्या रुममध्ये एक गेम खेळतात. हे सर्वजण मित्र असतात. यापैकी रिषभ मलिक प्लास्टिक सर्जन आहे, जो पत्नी वर्तिकापासून घटस्फोट घेण्याच्या तयारीत आहे. या सर्वांना वर्तिका एक चॅलेंज देते. त्यानुसार सर्वांना आपले फोन एका टेबलवर ठेवावे लागतील. सर्वांना जे फोन येतील ते सर्वांसमोर उचलायचे, मेसेजही सर्वांनी बघायचे असं ठरतं. सर्वजण खेळ खेळायला तयार होतात. त्यानंतर गंमत म्हणून सुरू केलेल्या या खेळातून सर्वांची अनेक गुपितं उलगडतात.

          ५. रायन

          रायन हा धनुषने दिग्दर्शित केलेला दुसरा तमिळ चित्रपट आहे. कलानिती मारन व सन पिक्चर्सने याची निर्मिती केली आहे. यात धनुष मुख्य भूमिकेत असून दुशरा विजयन, एस.जे. सूर्या आणि सेल्वाराघवन या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा उत्तर चेन्नईतील एका फास्ट-फूड रेस्टॉरंटच्या मालकाभोवती फिरते. हा धनुषचा ५० वा सिनेमा आहे. हा चित्रपट २६ जुलैला जगभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला संगीत, सिनेमॅटोग्राफी आणि परफॉर्मन्ससाठी प्रेक्षकांचा व समीक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने जगभरात १५० कोटींहून जास्त कमाई केली. हा २०२४ मधील दुसरा-सर्वाधिक कमाई करणारा तमिळ चित्रपट आणि आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा ए-रेटेड तमिळ चित्रपट बनला.

          raayan
          रायन (फोटो – गुगलवरून साभार)

          रायन चित्रपटाची कथा : रायन चार भावंडांपैकी सर्वात मोठा असतो. त्याला दोन लहान भाऊ मुथू व मणिकम असतात तर दुर्गा नावाची लहान बहीण असते. बहिणीवर रायनचं खूप प्रेम असतं. एकेदिवशी त्याचे आई-वडील भावंडांची जबाबदारी त्याच्यावर सोपवून निघून जातात व ते कधीच परत येत नाही. यानंतर तो वडिलांप्रमाणे लहान भावंडांचा सांभाळ करतो. याचदरम्यान तो सर्वांना घेऊन चेन्नईला निघून जातो. खूप वर्षांनी तो एका फास्ट फूड हॉटेलचा मालक बनतो. मणिकम कॉलेजला असतो, तर मुथू दारूच्या आहारी जातो आणि मेखलाबरोबर राहतो. एकेदिवशी मुथूचं काही लोकांशी भांडण होतं आणि तो गँगस्टरच्या मुलाचा खून करतो. यानंतर एका गँगस्टरचा मुलगा सेथू आपल्या वडिलाचे खून करणाऱ्या दुरईशी बदला घेण्याच्या तयारीत असतो. नवीन पोलीस आयुक्त सरगुमन या लोकांमध्ये भांडणं व्हावी यासाठी प्रयत्न करतो. रायन व त्याची भावंड फसवणूक, विश्वासघात व बदल्याच्या या जाळात अडकतात, अशी या चित्रपटाची कथा आहे.

          “ती माझी मुलगी नाही,” ऐश्वर्या रायबद्दलच्या ‘त्या’ प्रश्नावर जया बच्चन यांनी केलेलं वक्तव्य

            ६. लैला मजनू

            लैला मजनू हा अविनाश तिवारी व तृप्ती डिमरी यांच्या मुख्य भूमिका असलेला २०१८ मधील रोमँटिक बॉलीवूड चित्रपट आहे. याचे दिग्दर्शन साजिद अलीने केले आहे. या चित्रपटाची सह-निर्मिती एकता कपूर, शोभा कपूर आणि प्रीती अली यांनी केली होती. या चित्रपटात मॉडर्न लैला- मजनूची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ७ सप्टेंबर २०१८ रोजी हा सर्वात आधी थिएटरमध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपयश झालं होतं. नंतर हा ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. सहा वर्षांनी हा चित्रपट ९ ऑगस्ट २०२४ रोजी पुन्हा एकदा देशातील काही मोजक्याच शहरांमध्ये प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाला पुन्हा प्रदर्शित झाल्यावर प्रेक्षकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला.

            laila majnu
            लैला मजनू (फोटो – गुगलवरून साभार)

              लैला मजनू चित्रपटाची कथा: एका प्रतिष्ठित कुटुंबातील एक मुलगी लैला कैस भट्टच्या प्रेमात पडते. पण या दोघांच्या कुटुंबात वाद असतात. लैला कैससोबत पळून गेल्यास जीव देईन असं म्हणत तिचे वडील तिला इब्बानशी लग्न करण्यास भाग पाडतात. कैसने अपमान केल्याचं तिचे वडील सांगतात आणि यावर विश्वास ठेवून ती त्याच्याशी संबंध तोडते. वडिलांचे निधन झाल्याने चार वर्षांनी कैस लंडनमधून परत येतो पण तो लैलाला भेटत नाही. लैला तिच्या व्यसनी आमदार पतीबरोबर खूश नसते. पतीच्या अपघाती मृत्यूनंतर लैला पुन्हा कैसकडे जायचं ठरवते. पण तिचे वडील तिला लवकर जाऊ देत नाही. याचदरम्यान कैस भावनिकरित्या उद्ध्वस्त झालेला असतो आणि त्याला लैला कधीच भेटणार नाही असं त्याला वाटतं. त्याला सगळीकडे लैला असल्याचे भास होतात, अशातच तो एका डोंगरावर निघून जातो. त्याला वाटतं लैला त्याच्यासोबत आहे आणि तो तसाच जगू लागतो. कैसला शोधणाऱ्या लैलाच्या हातात एक चिठ्ठी असते ती हातात असतानाच ती बेशुद्ध होते व तिला हृदयविकाराचा झटका येतो. लैला आता हयात नाही याची जाणीव कैसला होते व तो तिच्या समाधीजवळ पोहोचतो. तिथे पुन्हा लैला त्याला बोलवत असल्याचा भास होतो आणि दोघांच्या आत्मा एकत्र आहेत, असं दाखवणाऱ्या एका गाण्याने चित्रपट संपतो.

              Story img Loader