Brahmin Genes controversy: समाज माध्यमावर अनेक लोक व्यक्त होत असतात. त्यांनी तिथे काय लिहावे किंवा काय मत मांडावे, हा सर्वस्वी ज्याचा-त्याचा अधिकार आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार प्रत्येकाला आपापल्या समाज माध्यमावर काय लिहावे, याचे स्वातंत्र्य आहे. मात्र बंगळुरूमधील कंपनीच्या एका महिला सीईओला केवळ दोन शब्दांच्या पोस्टमुळे ट्रोलिंग आणि व्यापक समर्थन अशा दोन्ही प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. अनुराधा तिवारी यांनी दोन दिवसांपूर्वी ‘ब्राह्मण जीन्स’ अशा दोन शब्दांच्या पोस्टसह स्वतःचा एक फोटो एक्सवर अपलोड केला होता. त्यांच्या या पोस्टनंतर आता “Brahmin genes” हा शब्द एक्सवर ट्रेडिंग होत आहे.

अनुराधा तिवारी यांनी २२ ऑगस्ट रोजी त्यांच्या एक्स अकाऊंटवर स्वतःचा एक फोटो शेअर करत त्याला “Brahmin genes” असे कॅप्शन दिले होते. या पोस्टला आतापर्यंत ५३ लाख लोकांनी पाहिले आहे. तर तीन हजारांहून अधिक लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. तर २७ हजार लोकांनी या पोस्टला लाईक केले आहे. या पोस्टवर जोरदार चर्चा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनुराधा तिवारी यांनी आणखी एक पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिले.

priyanka chopra, nick Jonas
“देसी गर्ल…”, चाहत्यांच्या घोळक्यातून आला आवाज; प्रियांका चोप्रासह पती निक जोनासने दिली ‘अशी’ प्रतिक्रिया
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
sridevi akshay kumar
“अक्षय कुमारवर श्रीदेवी चिडल्या होत्या…”, प्रसिद्ध दिग्दर्शकाने सांगितला किस्सा; म्हणाला, “तो घाबरायचा…”
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
markadwadi women angry
Markadwadi : “मारकडवाडीत पडलेल्या ठिणगीचा देशभर वणवा पेटला पाहिजे”, शरद पवारांसमोरच महिलांनी एल्गार पुकारला!
Akshay Kumar
“लैंगिक शिक्षणावर चित्रपट करण्याची कुणाची हिंमत आहे का?” सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांवर बोलताना अक्षय कुमारचा प्रश्न

त्या म्हणाल्या, “अपेक्षेप्रमाणे, मी फक्त ब्राह्मण या शब्दाचा नुसता उल्लेख केला आणि अनेकांना नुसता चेव चढला. यावरूनच खरे जातीयवादी कोण आहेत, हे उघड होते. आम्हाला या व्यवस्थेकडून काहीच मिळत नाही. आरक्षण, मोफत सुविधा (योजना) असे काहीही मिळत नाही. आम्ही सर्व काही स्वबळावर मिळवतो. आम्हाला आमच्या वंशाचा अभिमान बाळगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जे आहे ते आहे.”

अनुराधा तिवारी यांच्या पोस्टचा अनेकांनी विरोध केला असला तरी बऱ्याच जणांनी त्यांना पाठिंबाही दर्शविला आहे. शनिवारी (दि. २४ ऑगस्ट) तिवारी यांनी आणखी एक पोस्ट लिहून आपल्या पोस्टचा अर्थ स्पष्ट केला. त्या म्हणाल्या, दलित, मुस्लीम, आदिवासी असल्याचा अभिमान बाळगता येतो. मग ब्राह्मण असल्याचा अभिमान का नाही बाळगायचा. ब्राह्मणांना दोष देण्यासाठी एक संपूर्ण यंत्रणा कार्यरत आहे. आता हे सर्व बदलण्याची वेळ आली आहे. आता क्षमाशील ब्राह्मण व्हा, बाह्या सरसावून पुढे या आणि मग तथाकथित सामाजिक न्यायाच्या योद्ध्यांना वाईट वाटलं तरी वाटू द्या.

त्यानंतर रविवारी (दि.२५ ऑगस्ट) अनुराधा तिवारी यांनी आणखी एक पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला. “आज ब्राह्मण समाजातील लोक स्वतःचे आडनाव उघड करण्यास घाबरतात. आपल्या विरोधात द्वेष पसरविण्याचे काम केले जाते. सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणी आपल्याला समाजाचे शत्रू असल्याचे दाखवितात. आपण कुणालाही त्रात देत नाहीत. सरकारकडून आपल्याला काहीही मिळत नाही. आपण मेहनत करतो. मग आपल्या जातीची लाज का बाळगायची?”, असा प्रश्न अनुराधा तिवारी यांनी उपस्थित केला.

Story img Loader