अमेरिकेच्या भारतातील राजदूतपदी नियुक्ती करण्यात आलेले एरिक गार्सेट्टी (Eric Garcetti) सध्या भारतातील विविध ठिकाणांची भेट घेताना दिसत आहेत. यापूर्वी त्यांनी दिल्ली मेट्रोचा प्रवास अनुभवला होता, तर आता त्यांनी दिल्ली येथील दुर्गा देवीची मूर्ती स्थापन केलेल्या एका मंडळाला भेट दिली आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत एरिक गार्सेट्टी यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. काही सुरक्षा कर्मचारी यांच्याबरोबर दिल्लीच्या चित्तरंजन पार्क (सीआर पार्क) येथील एका दुर्गा पूजा मंडळाला त्यांनी भेट दिली. तिथे पोहचताच त्यांचे पारंपरिक खास पद्धतीत स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी दुर्गा देवीची पूजा केली आणि मंडळातील सदस्यांसोबत धुनुची नृत्य केलं. दुर्गा पूजेच्या वेळी धुनुची नृत्य केले जाते. धुनुची नृत्य हे देवी दुर्गाला समर्पित केले जाते. त्यानंतर लहान मुलांच्या एका ग्रुपने रंगमंचावर डान्स सादर केला आणि या खास क्षणाचा राजदूत यांनी आपल्या मोबाइलमध्ये व्हिडीओ शूट करून घेतला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा