सध्या सोशल मीडियावर एका ई-रिक्षाचा स्फोट झाल्याच्या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या अपघाचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर शहारा आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर जिल्ह्यात फटाक्यांनी भरलेल्या ई-रिक्षाला आग लागली, यावेळी रिक्षात असलेल्या फटाक्यांमुळे तिचा मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयानक होता की, या घटनेत एकाचा मृत्यू आणि ३ जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना सोमवारी ग्रेटर नोएडाहून दादरीला जाणाऱ्या रस्त्यावर झाला. ही दुर्देवी घटना जगन्नाथ यात्रा सुरू असताना घडली. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. तर ई-रिक्षात झालेल्या स्फोटाची भयानक घटना दादरी रोड मार्केटमधील एका दुकानाच्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हेही पाहा- शर्यतीत धावणाऱ्या बैलाला मारणं तरुणाच्या अंगलट; Video पाहून नेटकरी म्हणाले, “कर्म तैसे फळ”
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्फोट झालेल्या ई-रिक्षातमध्ये जगन्नाथ यात्रेदरम्यान फोडण्यासाठीचे फटाके भरण्यात आले होते. मात्र, यावेळी कोणीतरी लावलेला एक फटाका उडून या रिक्षात आल्यामुळे मोठा स्फोट झाला. या स्फोटात यात्रा पाहणाऱ्या नागरिकांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत. फटाके ई-रिक्षातील कंटेनरमध्ये ठेवण्यात आले होते, त्याला आग लागल्याने त्याचा स्फोट झाला. स्फोट होताच तेथे उपस्थित असलेले लोक घाबरून इकडे पळाल्याचंही व्हिडीओत दिसत आहे. दरम्यान, ही आग पाण्याच्या टँकरने विझवण्यात आली.
पोलिसांनी दिली माहिती –
एडीसीपी (ADCP) ग्रेटर नोएडा यांनी ट्विटद्वारे या घटनेची माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, २७ फेब्रुवारी रोजी जगन्नाथ शोभा यात्रा आयोजित केली होती. यावेळी काही लोक फटाके फोडत असताना त्यातील एक फटाका जवळून जाणाऱ्या ई-रिक्षात पडला. ज्यामुळे हा स्फोट झाला.