Viral Video Of Woman Jumping On Escalator : एस्केलेटर (Escalator) म्हणजेच स्वयंचलित जिना हा बऱ्याच लोकांमध्ये एक सामान्य सिंड्रोम आहे. म्हणजेच आपल्यातील बरेच जण एस्केलेटरवर चढण्यास घाबरतात. असे प्रवासी दोन गटात विभागले जातात. एक बिनधास्त एस्केलेटरवर चढणारे, तर दुसरे एस्केलेटरवरून भीती वाटते म्हणून जिन्याचा उपयोग करणारे. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका महिलेला हा फोबिया असल्याचे दिसत आहे. ती एका मॉलमध्ये एस्केलेटर चालवताना धडपडताना दिसत आहे. नक्की काय घडलं लेखातून सविस्तर जाणून घेऊ.
नक्की काय घडलं ?
व्हायरल व्हिडीओ कुठला आहे याची अद्याप माहिती कळू शकलेली नाही. पण, आजूबाजूचा परिसर पाहता व्हिडीओ मॉलमधील आहे असे दिसून येत आहे. एक अज्ञात महिला एस्केलेटरवर चढण्यासाठी धडपडताना दिसत आहे. ती सुरुवातीला घाबरून एस्केलेटरवर उडी मारते. मग ती एस्केलेटरच्या पायऱ्यांवर बसते आणि हँडल घट्ट पकडते. चेहऱ्यावरचे हावभाव पाहता ती अगदीच चिंताग्रस्त आणि घाबरलेली दिसते आहे. हळूहळू पायऱ्या पुढे सरकतात आणि एस्केलेटरवरून उतरण्याची वेळ येते तेव्हा महिला नेमकं काय करते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.
व्हिडीओ नक्की बघा…
महिलेने एस्केलेटरवर मारली उडी (Viral Video Of Woman Jumping On Escalator) :
व्हायरल व्हिडीओतून तुम्ही पाहिलं असेल की, एस्केलेटरवर चढायला घाबरणारी महिला उडी मारून अगदी विचित्र पद्धतीत सरकत्या जिन्यांच्या पायऱ्यांवर बसते. त्यानंतर उतरताना ती बसलेल्या अवस्थेतच सरकत सरकत बाहेर येते; जे खूपच धोकादायक आहे. यावेळी महिलेने परिधान केलेला ड्रेस एस्केलेटरमध्ये अडकला असता तर मोठी दुर्घटना झाली असती. पण, असं काही झालं नाही. तसेच महिला बाहेर येताच आजूबाजूची मंडळीदेखील आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागली.
अज्ञात महिलेचे इन्स्टाग्राम प्रोफाइल अशा मजेदार आणि मनोरंजक व्हिडीओने भरलेलं आहे. ती तिच्या दर्शकांसाठी दररोज असे नवनवीन व्हिडीओ पोस्ट करत असते. कधी ती कार चालवताना दिसते, तर कधी नाचून तिच्या चाहत्यांना आकर्षित करते. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ndahiya2021 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. काही जण मजेशीर तर अनेक जण रीलसाठी कायपण करतील, अशा विविध कमेंट करताना दिसत आहेत.