Belly Dance Viral Video: दिवसेंदिवस इंटरनेटवर व्हायरल होणारे भन्नाट डान्सचे व्हिडीओ पाहून तुमचं मनोरंजन नक्कीच झालं असेल. पण एका इन्स्टाग्रामच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनं अनेकांच्या झोपा उडवल्या आहेत. कारण एका तरुणाने खलनायक सिनेमात अल्का यागनिक आणि इला अरुणने यांनी गायलेल्या ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. इशान हिलाल असं या तरुणाचं नाव असून तो बेली डान्स करण्यात माहीर आहे. तो नेहमी त्याचे व्हिडीओज इन्स्टाग्रामवर शेअर करुन सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतो. स्कर्ट आणि टॉपचा आऊटफिट घालून इशानने या गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावल्याचं व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून नेटकरी यावर भन्नाट प्रतिक्रियाही देत आहेत.
बेली डान्सचा व्हिडीओ झाला तुफान व्हायरल
इशान हिलालने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करुन #cholikepeeche असं हॅशटॅगही दिलं आहे. इशानने खलनायक सिनेमातील चोली के पीछे गाण्यावर अप्रतिम डान्स करुन सोशल मीडियावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्याच्या बेली डान्सची कला पाहून नेटकऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. चोली के पीछे गाणं लक्ष्मीकांत पॅरेलाल आणि आनंद बक्षी यांनी कंम्पोज केलं आहे. हा व्हिडीओ शेअर केल्यापासून आतापर्यंत २९ लाखांहून अधिक व्यूज या व्हिडीओला मिळाले आहेत. तसंचे बहुसंख्य नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाही या व्हिडीओला मिळाल्या आहेत.
इथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, भाऊ जबरदस्त डान्स केला”, दुसरा नेटकरी म्हणाला, तुला नोरा फतेहीसोबत डान्स करताना पाहायला आवडेल.” “माझा सर्वात आवडता बेली डान्सर आहे.” असं अन्य एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं. तसंच चौथा नेटकरी म्हणाला, “हे खूप सुंदर होतं, छान डान्स केला.” हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या लाईक्सही झपाट्याने वाढत आहेत. सोशल मीडियावर प्रकाशझोतात येण्यासाठी अनेक तरुण भन्नाट डान्स करुन व्हिडीओ व्हायरल करत असतात. पण इशानच्या या व्हिडीओनं कला क्षेत्रातील अनेकांची मनं जिंकली आहेत.